Others News

किसान क्रेडिट कार्डचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना कमीत-कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. सावकारापासून जास्त व्याजदराने कर्ज घेण्यापासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यात आले होते.

Updated on 06 January, 2021 3:44 PM IST

किसान क्रेडिट कार्डचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांना कमीत-कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. सावकारापासून जास्त व्याजदराने कर्ज घेण्यापासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यात आले होते. पैशांची गरज पडल्यास शेतकरी बँकेतून कर्ज घेऊ शकतात. तसेच कमी व्याजदरावर कर्ज मिळवण्यासाठी या किसान क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. 

हेही वाचा : किसान क्रेडिट कार्डसाठी द्या फक्त तीन डॉक्युमेंट्स

किसान क्रेडिट कार्डवर किती कर्ज मिळते? How much loan is available on Kisan Credit Card?

 केंद्र सरकारने नुकताच पंतप्रधान शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या जवळ-जवळ अडीच कोटी शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना या कार्डच्या माध्यमातून खते बियाण्यासाठी कर्ज सहजतेने उपलब्ध होते. विशेष म्हणजे या कार्डवर घेतलेल्या कर्जावरचे व्याज हे गतिशील आहे, म्हणजेच कर्ज घेतलेले शेतकरी जर वेळेवर कर्ज भरत असतील तर त्यांच्याकडून कमीत-कमी व्याज घेतले जाते. शेतकऱ्यांना या कार्डच्या माध्यमातून १ लाख ६० हजारपर्यंतचे कर्ज विना गॅरंटी मिळते. या कार्डवर शेतकरी ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.

 

केसीसीवरील कर्जावर व्याज किती आहे?  What is the interest on loan on KCC?

या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ५ वर्षांसाठी ३ लाख रुपयांपर्यंतचा शॉर्ट टर्म कर्ज मिळते. या कार्डचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या कार्डवर घेतलेल्या कर्जावर स्वस्त व्याज लागते. पिकांसाठी घेतलेल्या कर्जावर ७ टक्क्यांनी व्याज आकारले जाते, परंतु कर्ज फेडताना शेतकऱ्यांना ३ टक्क्यांची सबसिडी सरकार देत असते. त्यामुळे स्वस्त व्याजदराचा फायदा शेतकऱ्यांना तेव्हाच होईल जेव्हा ते कर्ज वेळेवर फेडतील.

परंतु कर्ज वेळेवर फेडले नाही तर शेतकऱ्यांना ७ टक्के व्याज द्यावाच लागेल. त्यामुळे किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाचे परतफेड वेळेवर करणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय पीक विमा योजनेत किसान क्रेडिट कार्डसाठी पात्र असलेल्या पिकांना कव्हर करते.

  माहिती स्त्रोत- डेली हंट

English Summary: Did you know that the interest on a loan on KCC is low?
Published on: 06 January 2021, 03:41 IST