आजच्या काळात बहुतांश लोक एटीएम कार्ड वापरतात शेतकरी राजाही पैशांचा व्यवहार एटीएममधूनच करत असतात. परंतु एटीएममधून पैसे काढताना बऱ्याच वेळा फाटलेल्या नोटा बाहेर येत असतात. परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. एटीएममधून फाटलेल्या नोटाही तुम्ही सहज चांगल्या नोटा मिळवू शकता. चला तर आपण त्याची प्रक्रिया जाणून घेऊया.
फाटलेल्या नोटा अशा प्रकारे बदलता येतात
जर एटीएममधून फाटलेल्या नोटा काढल्या गेल्या असतील, तर त्या बदलण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले आहेत त्या बँकेकडे तक्रार करावी लागेल. या तक्रारीमध्ये एटीएमची तारीख, वेळ आणि ठिकाण लिहावे लागणार आहे. तसेच तुम्हाला पैसे काढण्याची स्लिप जोडावी लागेल. जर तुमच्याकडे स्लिप नसेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजची माहिती द्यावी लागेल. वास्तविक, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणतीही सरकारी बँक नोटा बदलून घेण्यास सहमती देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, आता तुम्हाला फाटलेल्या नोटा सहज बदलून मिळू शकतात आणि या प्रक्रियेला जास्त वेळ लागत नाही.
बँकेने दिली माहिती
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने ही माहिती दिली आहे. एका ग्राहकाच्या तक्रारीची माहिती देताना एसबीआयने सांगितले की, या परिस्थितीत ग्राहकाने कोणती पावले उचलली पाहिजेत. एसबीआयने म्हटले आहे की, 'कृपया लक्षात घ्या की आमच्या एटीएममध्ये लोड करण्यापूर्वी नोटा अत्याधुनिक नोट सॉर्टिंग मशीनद्वारे तपासल्या जातात. त्यामुळे दूषित/फाटलेल्या नोटांचे वितरण अशक्य आहे. तथापि, तुम्ही आमच्या कोणत्याही शाखेतून नोटा बदलून घेऊ शकता.
तक्रार कशी नोंदवायची?
बँकेने असे नमूद केले आहे https://crcf.sbi.co.in/ccf/ under General Banking// Cash Related category तुम्ही याबाबत तक्रारही करू शकता. ही लिंक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसाठी आहे. अनेक अहवालांनुसार, कोणतीही बँक एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. तसेच, असे असतानाही बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ग्राहकाच्या तक्रारीच्या आधारे बँकेला 10 हजारांपर्यंतचे नुकसानही भरावे लागू शकते.
Published on: 25 March 2022, 09:24 IST