Others News

Dhantrayodashi 2022 : हिंदू धर्मात दिवाळीला खूप महत्त्व आहे. या महान सणाची वर्षभर प्रत्येकजण वाट पाहत असतो. धूमधडाक्यात साजरा होणारा दिवाळी हा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. छोटी दिवाळीच्या एक दिवस आधी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. या दिवशी भगवान कुबेर, भगवान धन्वंतरी (dhanwantri) आणि माता लक्ष्मी (Laxmi) यांची विधिवत पूजा केली जाते.

Updated on 22 October, 2022 7:37 AM IST

Dhantrayodashi 2022 : हिंदू धर्मात दिवाळीला खूप महत्त्व आहे. या महान सणाची वर्षभर प्रत्येकजण वाट पाहत असतो. धूमधडाक्यात साजरा होणारा दिवाळी हा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. छोटी दिवाळीच्या एक दिवस आधी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. या दिवशी भगवान कुबेर, भगवान धन्वंतरी (dhanwantri) आणि माता लक्ष्मी (Laxmi) यांची विधिवत पूजा केली जाते.

धनत्रयोदशी 2022 शुभ मुहूर्त

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीची सुरुवात - 22 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 6.02 पासून त्रयोदशी तारीख संपेल - 23 ऑक्टोबर 2022, संध्याकाळी 6.03 वाजता या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त - रविवार, 23 ऑक्टोबर 2022 5:44 ते 06:05 पर्यंत

धनत्रयोदशीची पूजा पद्धत

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी शुभ मुहूर्तावर कुबेर आणि धन्वंतरी यांची उत्तरेकडे स्थापना करा. तसेच माँ लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. त्यानंतर दिवा लावून विधिवत पूजा सुरू करावी.

टिळक केल्यानंतर फुले, फळे अर्पण करावीत. कुबेर देवाला पांढरी मिठाई आणि धन्वंतरी देवाला पिवळी मिठाई अर्पण करा. पूजेदरम्यान 'ओम ह्रीं कुबेराय नमः' या मंत्राचा जप करत राहा. भगवान धन्वंतरीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी धन्वंतरी स्तोत्राचे पठण करावे.

धनतेरसच्या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी लोक जास्तीत जास्त सोने खरेदी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस हे अश्विन महिन्यात तेराव्या दिवशी येत असते. धनतेरस च्या दिवशी धन्वंतरी चा जन्म झाल्याची माहिती आहे.

English Summary: Dhantrayodashi 2022 : Know the auspicious time, significance and method of worship
Published on: 22 October 2022, 07:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)