नवी दिल्ली : सरकारी कर्मचारी महागाई भत्त्याच्या (डीए) वाढीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील महिन्यापर्यंत चांगली बातमी मिळू शकते. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. (dearness allowance) म्हणजेच एकूण डीए ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.
सरकार सप्टेंबर महिन्यात याची घोषणा करू शकते. यासोबतच सरकार मनी ट्रान्सफरची प्रक्रिया सप्टेंबरमध्येच सुरू करू शकते. महागाई भत्त्यात वाढीसोबतच कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकीही मिळू शकते.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा सुधारणा केली जाते. पहिला जानेवारी ते जून, तर दुसरा जुलै ते डिसेंबर या कालावधीत दिला जातो.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवा वेतन आयोग? जाणून घ्या किती असेल पगार...
एप्रिल 2022 साठी अखिल भारतीय CPI-IW 1.7 गुणांच्या वाढीसह 127.7 वर राहिला. कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा डेटा दर्शवितो की 1-महिन्यातील टक्केवारीतील बदलानुसार, मागील महिन्याच्या तुलनेत ते 1.35 टक्क्यांनी वाढले आहे, एका वर्षापूर्वी याच महिन्यात 0.42 टक्के वाढ झाली होती.
मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार, AICPI चे मे महिन्याचे आकडे 129 वर आहेत. दरम्यान, जून महिन्याचा AICP निर्देशांक निश्चितपणे डीए वाढणार असल्याचे संकेत देत आहे. AICPI चे जूनचे आकडे 129 वर आहेत. 2022 च्या महागाई भत्त्यात पहिली वाढ मार्चमध्ये जाहीर करण्यात आली होती.
Business Tips: 15 हजार रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत होणार कमाई
Published on: 30 August 2022, 10:08 IST