Others News

डीए अर्थात महागाई भत्ता संबंधी येत्या दोन दिवसात म्हणजेच एक जुलै रोजी कर्मचाऱ्यांना मोदी सरकार कडून एक चांगली बातमी मिळण्याची शक्यता असून महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.

Updated on 28 June, 2022 5:46 PM IST

 डीए अर्थात महागाई भत्ता संबंधी येत्या दोन दिवसात म्हणजेच एक जुलै रोजी कर्मचाऱ्यांना मोदी सरकार कडून एक चांगली बातमी मिळण्याची शक्यता असून महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.

तसे पाहायला गेले तर एप्रिल महिन्यामध्ये एआयसीपीआय निर्देशांक 127 अंकाच्या वर पोहोचला आहे. महागाई मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने महागाई भत्त्यात वाढ होण्याची कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा देखील वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर काही मीडिया रिपोर्टनुसार विचार केला तर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात अर्थात डीएत पाच टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असून तसे झाल्यास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात  34 टक्क्यांवरून 39 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होईल. यामुळे कर्मचार्‍याच्या पगारात 34 हजार पेक्षा जास्त वाढ संभवते.

नक्की वाचा:7th Pay Commision: कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्याच्या डीए थकबाकीचे एकरकमी येणार 1.50 रुपये, वाचा सविस्तर माहिती

 जानेवारी महिन्यात सरकारने वाढवला होता महागाई भत्ता

 सातवा वेतन आयोगाच्या संदर्भात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए जानेवारी महिन्यात 31 वरून 34 टक्के करण्यात आला होता.

त्यासोबतच एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 7.79 टक्क्यांवर आहे जो आठ वर्षांचा उच्चांक आहे. यापूर्वी ए आय सी पी आय निर्देशांक 2022 च्या पहिल्या दोन महिन्यांसाठी जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये घसरला होता.

जानेवारीमध्ये 125.1, फेब्रुवारीमध्ये 125 नंतर मार्चमध्ये 1 पॉईंटणे वाढून 126 वर पोहोचला.एप्रिलच्या आकडेवारीचा विचार केला तर त्यानुसार,ए आय सी पी आय निर्देशांक 127.7 वर आला आहे.

त्यामध्ये,1.35 टक्के वाढ झाली आहे.  म्हणजे आता मे आणि जूनचा  डेटा 127 च्या पुढे गेला तर डीए पाच टक्क्यांनी वाढ होऊ शकतो.

नक्की वाचा:मधमाशी मित्र' तयार करण्याचा राज्यातील पहिलाच उपक्रम; रोजगारही होणार उपलब्ध

 पगारात होईल चांगले वाढ

 एक जुलैपासून कर्मचाऱ्यांचा डीए वाढू शकतो असे मानले जात आहे. पूर्वी 34 टक्के डीए मिळणार या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 39 टक्के डीए मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन 56 हजार 900 रुपये आहे. 39टक्के महागाई भत्ता मिळाल्यावर त्यांना 22 1191 रुपये डीए मिळेल. सध्या 34 टक्के दराने एकोणावीस हजार 346 रुपये मिळत आहेत.

पाच टक्के डीए वाढल्याने पगारात  2845 रुपयाची वाढ होईल. म्हणजेच वर्षाला सुमारे 34 हजार 140 रुपयांची वाढ होणार आहे.

नक्की वाचा:7th Pay Commission: मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांना DA सोबतच HRA देखील वाढणार, कर्मचाऱ्यांची चांदी

English Summary: DA growth 5 percent in will be coming two days central goverment can such announcement
Published on: 28 June 2022, 05:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)