Others News

Petrol Diesel Price Today: देशात महागाईचा भडका उडाला आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्वच वस्तू महागल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शंभरी पार गेल्या आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट ढासळले आहे.

Updated on 06 September, 2022 10:07 AM IST

Petrol Diesel Price Today: देशात महागाईचा भडका उडाला आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्वच वस्तू महागल्या आहेत. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती शंभरी पार गेल्या आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट ढासळले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $ 95 च्या खाली आहे. कच्च्या तेलाच्या (Crude Oil) घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर आज 4 सप्टेंबरलाही स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोलची किंमत 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 79.74 रुपये प्रति लिटर आहे.

मोठी बातमी! संजय राऊतांबाबत कोर्टाने घेतला मोठा निर्णय...

याआधी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कधी बदल झाला?

यापूर्वी 22 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्र वगळता सर्व राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जुलै महिन्यात महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्यातील जनतेला किरकोळ दिलासा दिला होता.

Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचा जोर वाढणार! या जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुख्य शहरातील दर

दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.

मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.

कोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.

हैदराबाद : पेट्रोल १०९.६६ रुपये आणि डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर.

बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.

तिरुवनंतपुरम : पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.

महत्वाच्या बातम्या:
Rain Alert: राज्यात पुन्हा मुसळधार कोसळणार! अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
शिंदे सरकार जनतेला देणार झटका! वीज दरात वाढ होण्याची शक्यता

English Summary: Crude oil prices fell! new petrol diesel rates
Published on: 06 September 2022, 10:07 IST