Petrol Price: नेहमीप्रमाणे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर इंडियन ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (Indian Oil Marketing Companies) आजही जाहीर केले आहेत. महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग 110 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या, ब्रेट क्रूड प्रति बॅरल सुमारे $92 आहे. यापूर्वी 21 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise duty) प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपये आणि 7 रुपयांनी स्वस्त झाले. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केली.
BEL Recruitment 2022: बेलमधील अभियांत्रिकी सहाय्यकांसह विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या तपशील...
सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर विकला जात आहे. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
इथे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळते
पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोलची किंमत 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
पावसाची उघडीप! खरीप हंगामातील पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
मुख्य शहरातील दर
दिल्ली : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल १०९.६६ रुपये आणि डिझेल ९७.८२ रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.
तिरुवनंतपुरम : पेट्रोल १०७.७१ रुपये आणि डिझेल ९६.५२ रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.
महत्वाच्या बातम्या:
संकटांची मालिका संपेना! शेतकऱ्यांची चिंता वाढली, सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला
Tata Motors: टाटा मोटर्स सीएनजी कारसह अनेक गाड्यांवर देत आहे बंपर सूट; जाणून घ्या सविस्तर
Published on: 08 September 2022, 09:28 IST