Others News

मृग बहार-2019 मध्ये डाळिंब पिकासाठी ही योजना बुलढाणा, जळगाव, धुळे, सांगली, सोलापूर, नाशिक, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड, पुणे, सातारा, वाशिम, अमरावती या 16 जिल्ह्यामधील अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.

Updated on 26 July, 2019 11:51 AM IST


मृग बहार-२०१९ मध्ये डाळिंब पिकासाठी हि योजना बुलढाणा, जळगाव, धुळे, सांगली, सोलापूर, नाशिक, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, लातूर, उस्मानाबद, बीड, पुणे, सातारा, वाशिम, अमरावती या १६ जिल्ह्यामधील अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.

सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशीलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. डाळिंब पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पिक नुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

डाळिंब पिकासाठी हवामान धोके:

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) विमा संरक्षण कालावधी  प्रमाणके (ट्रीगर) व नुकसान भरपाई रक्कम रु. प्रती हेक्टर 
पाऊसाचा खंड   १५/७/२०१९ ते  १५/८/२०१९  या कालावधीत सलग पाऊसाचा खंड २० दिवस राहिल्यास रु. ५,५००/-  
या कालावधीत सलग पाऊसाचा खंड २१ ते २५  दिवस राहिल्यास रु. ११,०००/-  
या कालावधीत सलग पाऊसाचा खंड २५ दिवसांपेक्षा जास्त  राहिल्यास रु. १६,५००/-  
पाऊसाचा खंड १६/८/२०१९ ते १५/१०/२०१९  या कालावधीत सलग पाऊसाचा खंड २० दिवस राहिल्यास रु. १६,०००/-  
या कालावधीत सलग पाऊसाचा खंड २१ ते २५  दिवस राहिल्यास रु. २७,०००/-  
या कालावधीत सलग पाऊसाचा खंड २५ दिवसांपेक्षा जास्त  राहिल्यास रु. ३८,५००/-  
जास्त पाऊस  १६/१०/२०१९ ते ३१/१२/२०१९  या कालावधीत एका दिवसात ४५ मि.मि. ते ६० मि.मि. दरम्यान पाऊस पडल्यास रु. ११,०००/-  
या कालावधीत एका दिवसात ६० मि.मि. ते ९० मि.मि. दरम्यान पाऊस पडल्यास रु. २७,०००/-  
या कालावधीत एका दिवसात ९० मि.मि.किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडल्यास रु. ६६,०००/-  

 

  • एकूण नियमित विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर रु. १,२१,०००/-  
  • शेतकर्‍यासाठी विमा हप्ता रु. ६,०५०/-
    (टीप: विमा हप्ता वास्तववादी दर ५% पेक्षा कमी असल्यास, जो कमी दर आहे त्यानुसार शेतकरयास विमा हप्ता भरावा लागेल)

योजनेतील सहभाग:

  • डाळिंब पिक कर्ज घेतले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील.
  • बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक राहील.
  • फळ पिकाखालील किमान २० हेक्टर किंवा जास्त उत्पादनक्षम क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळात ही योजना राबविण्यात येते, मात्र सदर मंडळ शासनामार्फत अधिसूचित होणे आवश्यक असते.

सदर योजना खालील विमा कंपनीचे मार्फत खालील जिल्हयातील संत्रा फळपिकांसाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ पातळीवर कार्यान्वित करण्यात येईल.

अ. क्रमांक

समाविष्ट जिल्हे

विमा कंपनीचे नाव व पता

जळगाव, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, लातूर, बीड, सातारा, वाशिम, अमरावती.

बजाज अलायन्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी
कॉमरझोन, पहिला मजला, टॉवर १, सम्राट अशोक पथ,
जेल रोड, येरवडा- ४११ ००६.
टोल फ्री क्र. १८०० २०९ ५९५९
फोन. न. ०२०-६६२४०१३७
ई-मेल: pramod.patil01@bajajallianz.co.in
anupam.shery@bajajallianz.co.in

नाशिक, धुळे

एस.बी.आय जनरल इन्श्युरन्स कंपनी
१ ला मजला. के. डी. प्लाझा, २८ ९ / ६-७,
नेहरू रोड / शंकरशेट रोड, ७ लव्ह हॉटेल जवळ,
स्वारगेट जवळ, पुणे- ४११ ०४२.
फोन न. ०२२-४२४१२७२२
फॅक्स न. ०२२-४०२३५५२२
टोल फ्री क्र. १८०० १२३२ ३१०
ई-मेल: shashikant.bhosure@sbigeneral.in

पुणे, बुलढाणा, जालना, अकोला, उस्मानाबाद

एचडीएफसी –एर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनी
ओनेक्स, चौथा मजला, नॉर्थ मेन रोड,
वेस्टीन हॉटेलच्या पुढे, कोरेगाव पार्क, पुणे-४११ ००१.
टोल फ्री क्र. १८०० २६६० ७००
ई-मेल: shailesh.thakur@hdfcergo.com
nilima.saste@hdfcergo.com
shekhar.kapale@hdfcero.com

 

  • बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत किंवा ऑनलाईन फळपिक विमा पोर्टल pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करुन सहभाग घेवू शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७/१२, ८(अ) उतारा व पिक लागवडीचा दाखला, बँक पासबूक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल.
  • शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या ५% च्या मर्यादित राहणार आहे. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून थेट कंपनीकडे जमा करण्यात येतो.
  • भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक १५ जुलै २०१९.

अधिक महितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, संबंधित विमा कंपनी यांचेकडे संपर्क साधावा.

श्री. विनयकुमार आवटे
(अधिक्षक कृषी अधिकारी, मनरेगा, पुणे विभाग) 
९४०४९६३८७०

English Summary: Crop Insurance for Pomegranate
Published on: 11 June 2019, 08:01 IST