सध्या आपल्याला माहीतच आहे की सोशल मीडिया म्हटले म्हणजे एक आपली मतं, कौशल्य म्हणजे बरेच काही सांगता येईल अशा गोष्टी व्यक्त करण्याचे हक्काचे ठिकाण आहे.
फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नंतर युट्युब हेसुद्धा एक खूप प्रसिद्ध असे सोशल मीडिया माध्यम आहे. जर आपण युट्युब चा विचार केला तर एका मिनिटाला पाचशेपेक्षा अधिक तासांचे व्हिडिओ अपलोड होत असतात आणि एका दिवसाचा जर व्हिडिओ पाहण्याचा तासांचाविचार केला तर दहा लाखांपेक्षा अधिक तास व्हिडिओ पाहिले जातात. आपल्याला माहित आहेच कि युट्युब हे एक माहितीपूर्ण तसेच मनोरंजन युक्त तसेच आकर्षक व्हिडिओ बनवून चांगले पैसे कमवण्याची सर्वात शक्तीशाली साधनआहे.या लेखात आपण यूट्यूब च्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे याबाबत माहिती घेऊ.
YouTude च्या माध्यमातून पैसे कसे कमवावे?
त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला युट्युब वर स्वतःचे चॅनेल सुरु करावे लागेल. त्यासाठी पुढील टप्प्यांचा अभ्यास करा व त्याद्वारे आपली चैनल सुरू करा.
1-सगळ्यात आधी आपले जीमेल अकाउंट मध्ये लॉग इन करावेआणि त्यानंतर युट्युब डॉट कॉम वर यावे.
2- नंतर स्क्रीनच्या उजव्या बाजूला अगदी कोपऱ्यामध्ये यूजर आयकॉन असतो त्यावर क्लिक करावे. व सेटिंग मध्ये जाऊन सेटिंग ला क्लिक करावे.
3- या सेटिंग मध्ये अकाउंट सेक्शन मध्ये क्रीएट अकाऊंट असा एक पर्याय असतो त्यावर क्लिक करा.
4-त्यानंतर तुम्ही तुमच्या चैनल चे नाव सिलेक्ट करावे.यालाच ब्रँडनेम असे देखील म्हणतात.तुमच्या चैनल ला एक चांगले नाव देऊन पुढील भागात तुमच्या चैनल बद्दल काही माहिती भरावी लागते.
जे व्हिडीओ चॅनेलवर टाकाल त्याबद्दल एक निश्चित प्लान तयार करणे
तुम्ही तुमचे चॅनेल तयार केल्यानंतर त्या चैनल वर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करणार आहात, तसेच त्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा प्रेक्षक तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करायचा आहे व तुमचे व्हिडिओ कोणत्या विषयाबद्दल माहिती देणार्या असतील या गोष्टींचा विचार करणे फार गरजेचे आहे. यामध्ये सोपी आयडिया अशी आहे की, व्हिडिओ कन्टेन्ट बनवताना असा बनवावा की तो बऱ्याच वेळ प्रेक्षकांना खिळवून ठेवील आणि सहजतेने लोकांमध्ये पॉप्युलर होईल. व्हिडिओचे गुणवत्ता चांगली असणे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हाच तुमचे व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर होतील आणि तुमच्या चैनल सबस्क्रीप्शन देखील वाढेल. व्हिडिओ मध्ये जर तुम्ही मनोरंजनात्मक व्हिडिओ टाकले तर ते कमीत कमी वेळात खूप प्रसिद्ध होतात आणि खूप लवकर काळानुरूप गायब देखील होतात हे कळत देखील नाही.अगदी कमी वेळात ते तुम्हाला भरपूर प्रसिद्धी आणि पैसा मिळवून देण्याची
ताकद ठेवतात. जर तुम्ही इन्फॉर्मेशन वर आधारित व्हिडिओ टाकले तर ते लवकर प्रसिद्ध होत नाहीत परंतु यांची लाइफ फार मोठी असते. कारण माहिती पूर्ण व्हिडिओ हे हळूहळू प्रसिद्ध होत जातात कारण वेगळी माहिती शोधणारे लोक कोणत्याही वेळी आणि कोणत्याही काळी या व्हिडिओ वर येऊ शकतात. त्यामुळे माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाहळूहळू उत्पन्न मिळेल परंतु स्थिर उत्पन्न देण्याची ताकद या व्हिडिओमध्ये आहे.
नक्की वाचा:वर्मी कंपोस्ट व्यवसाय घरबसल्या लाखोंची कमाई आणि कमी बजेट
त्यामुळे तुमची व्हिडीओ कन्टेन्ट कोणत्या टाईपचे आहेत यावर तुमचे चॅनल चे मार्केट ठरत असते. यामध्येतुमचे चैनल चे पहिले 1000 सबस्क्रायबर करणे आणि एक वर्षाच्या आत त्यातील व्हिडिओ चार हजार तास पाहिले जाणे गरजेचे असते तर तुमचे गूगल अड्सेंस खाते सुरू होऊ शकते. तुमच्या या गूगल अड्सेंस खात्यामध्ये तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाहिरातींद्वारे किती उत्पन्न मिळवले ते देखील कळते.
साधारणपणे एका महिन्याला शंभर अमेरिकन डॉलरचे उत्पन्न झाले की ते तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जाते. एकदा कि वर उल्लेख केलेली प्रोसेस पूर्ण झाली की तुम्हाला फक्त तुम्ही कोणत्या टाईपचे व्हिडिओ टाकतात त्या टाईप चे व्हिडिओ अपलोड करून तुमच्या चैनल वर टाकायचे आहे. पुढे गुगल व्हिडिओच्या विषय कोणता आहे आणि तो पाहणाऱ्या प्रेक्षकांना नुसार त्यामध्ये जाहिराती टाकत जाईल व ठरावीक रक्कम तुमच्या खात्यात जमा होऊन दर महिन्याला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करेल.
Published on: 11 April 2022, 01:37 IST