Others News

आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज दहा जानेवारी ला सराफ बाजारांमध्ये घसरण नोंदवली गेली. मार्केटमध्ये सोन्याचा भाव 47 हजार पाचशे रुपये च्या जवळपास येऊन थांबला.

Updated on 10 January, 2022 6:06 PM IST

आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज दहा जानेवारी ला सराफ बाजारांमध्ये घसरण नोंदवली गेली. मार्केटमध्ये सोन्याचा भाव 47 हजार पाचशे रुपये च्या जवळपास येऊन थांबला.

आज सोन्याच्या भावात 65 रुपयाची घसरण होऊन 47 हजार 518 रुपये इतका झाला. तसेच चांदीचा बाजार भाव आज साठ हजार 54 रुपये किलो असा आहे.

 सोन्याचे आजचे बाजार भाव

 24 कॅरेट सोन्याचा आजचा बाजार भाव 47 हजार 518 रुपये आहे.गेल्या शुक्रवारी हाच बाजार भाव 47 हजार 583 रुपये होता आज भावात 65 रुपयाची घसरण झाली.

23 कॅरेट सोन्याचे सरासरी किंमत 47 हजार 328 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 43 हजार 571 रुपये आहे. त्यासोबतच 18 कॅरेट चा भाव पस्तीस हजार सहाशे 75 रुपये पोहोचला आहे. तसेच 14 कॅरेट सोन्याचा भाव 27798 रुपये आहे.

 चांदीचे आजचे भाव

सराफ बाजारामध्ये एक किलोग्राम चांदीचा भाव 60 हजार 54 रुपये आहे. काल चांदीचा भाव हा 59 हजार 951 रुपयांवर बंद झाला होता. चांदीच्या भावात देखील 63 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

English Summary: countinue decrease rate of gold from last three days in market
Published on: 10 January 2022, 06:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)