जर असे वास्तव ऐकले वाचले की दर मिनिटाला 11 लोक उपासमारीमुळे मरत आहेत, तर यापेक्षाही वेदनादायक आणखी काय असू शकते? दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या ऑक्सफॅम या संस्थेच्या अहवालात असेही समोर आले आहे की यावर्षी दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्याची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत सहापट वाढली आहे. ही आकडेवारीदेखील मोठ्या चिंतेचा विषय आहे कारण उपासमारीशी संघर्ष करणाऱ्या लोकांच्या संख्यात 2 कोटी ने वाढली आहे. 'द हंगर व्हायरस मल्टिप्लेक्स' नावाच्या अहवालात असे म्हटले आहे की, उपाशीपोटी मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांपेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे दर मिनिटाला सरासरी सात जण दगावतात.
एका अंदाजानुसार, जगात दररोज 15 कोटीहून अधिक लोक पुरेशा प्रमाणात पोटभर अन्न मिळत नसल्याने उपाशी राहत आहेत हे खूप भयावह स्थिती असून आफ्रिकन खंडातील देशांपासून ते जगातील बर्याच विकसनशील देशामध्ये बिकट परिस्थिती आहे. कोरोना जागतिक महामारीच्या धोक्यानंतर, उपासमारीच्या धोक्याचा सर्वात जास्त परिणाम यांच्या वर होत आहे .
मागील वर्षा पेक्षा या वर्षी ची परिस्थिती खूप वाईट आहे कारण जागतिक स्तरावरील गरीबी निर्मुलन कार्यक्रम या कोरोना महामारी मुळे अडचणीत सापडला असून गरीबी भूकबळी निर्मूलन हे आणखी कठीण झाले आहे कारण जागतिक अन्न कार्यक्रमास पाठिंबा देणारे देशाच्या अर्थव्यवस्था कोरोना साथीच्या आजाराच्या संकटात सापडले आहेत. ग्लोबल फूड प्रोग्रामसह इतर मोहिमांमध्ये मुख्यतः अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, रशिया आणि चीन यासारख्या देशांची आर्थिक संरचना ढासळली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्राने 35 अब्ज डॉलर्सची 20 कोटी लोकांना मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली होती, त्यापैकी निम्म्याहूनही अधिक रक्कम केवळ 17 अब्ज डॉलर्स निधी गोळा करता आली .
ऑक्सफॅम अमेरिकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अॅबी मॅक्समॅन यांचे म्हणणे आहे की, भुकबळी उपासमारीमुळे मृत्यूची आकडेवारी धक्कादायक आहे. परंतु हे विसरता कामा नये की हे भुकबळी अकल्पनीय दु: खाच्या काळात घडलेल्या कोरोना महामारी मुळे झाले आहेत. जगातील सुमारे 15.5 कोटी लोकांना अन्न कमतरतेच्या तीव्र संकटाचा सामना करावा लागला आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. गतवर्षीच्या आकडेवारीपेक्षा बाधित लोकांची संख्या दोन कोटी जास्त आहे असून यातील सुमारे दोन तृतीयांश लोक उपासमारीची शिकार आहेत.
लोकांना उपासमारीचा त्रास का होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या देशात चालू असलेला,सत्ता लष्करी संघर्ष.
मॅक्समॅनच्या मते, निर्दय संघर्ष आणि वाढत्या हवामानाच्या संकटामुळे 5 लाख 20 हजारांहून अधिक लोकांना उपासमारीच्या मार्गावर आणले आहे. जागतिक महामारीचा सामना करण्याऐवजी परस्परविरोधी गट एकमेकांशी लढाई, झुंज देत आहेत, कोरोना महामारी सर्व जगभर पसरली असूनसुद्धा ह्या महामारीचा सामना करण्याऐवजी जगात सत्ता संघर्ष सुरू आहे .जगभरातील सैन्यावरील खर्च $ 51 अब्ज डॉलर्सने वाढला आहे. ही रक्कम संयुक्त राष्ट्राने उपासमार संपविण्याच्या आवश्यकतेपेक्षा कमीतकमी सहापट जास्त आहे.
अहवालात उपासमारीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत ज्या देशांचा समावेश आहे, ते आहेतः इथिओपिया, अफगाणिस्तान, सिरिया, दक्षिण सुदान आणि येमेन. या सर्व देशांमध्ये संघर्षाची परिस्थिती आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मॅक्समॅन यांचे विधान असे स्पष्ट करतो की सामान्य नागरिकांना अन्न आणि पाणी नाकारून मानवतावादी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचू न देणे हे उपासमारीला युद्धासाठी शस्त्र वापरण्यासारखे आहे.
ज्या देशांमध्ये प्रंचड लोकसंख्या अशा गंभीर मानवतावादी संकटांना सामोरे जात आहे, निःसंशयपणे त्या देशांची धोरणे त्याच्या उत्पत्तीस अधिक जबाबदार आहेत. बहुतेक लॅटिन अमेरिकन आणि आफ्रिकन देशही सत्तेच्या संघर्षासारख्या संकटांनी झेलत आहेत. अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धांमुळे नागरिक विस्थापित झाले आहेत. विकसनशील देशांची परिस्थिती देखील वाईट आहे कारण गरीब लोकांबद्दलची सरकारांची वृत्ती व धोरणे उदारमतवादी नसल्यामूळे या संकटांची तिव्रता वाढत आहे .
संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी एक वर्षापूर्वी असा अंदाज व्यक्त केला होता की साथीच्या आजारामुळे 5 कोटी लोक आणखी दारिद्र्यात ढकलले जातील . त्याची भीती आज वास्तवात येत आहे. सध्या जगातील निम्म्याहून अधिक लोकांना उपासमारीचा सामना करावा लागला आहे. तर जग हा कोरोना महामारी चा सामना करण्याच्या ओझ्याने वाकून गेले आहे अशा परिस्थितीत उपासमारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्याची गरज आहे.
विकास परसराम मेश्राम गोदिंया
vikasmeshram04@gmail.com
Published on: 16 November 2021, 07:39 IST