पुणे, एकीकडे देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे, तर घरगुती गॅस देखील प्रचंड महाग झाला आहे. यामुळे अनेकांना याची झळ बसत आहे. असे असताना आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात राज्यातील जनेतला दिलासा देण्यासाठी काही घोषणा केल्या आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारने सीएनजी गॅसवरील कर(व्हॅट) कमी केल्याने महाराष्ट्रात एप्रिल महिन्यापासून सीएनजी गॅस स्वस्त मिळणार आहे. अजित पवारांनी याबाबत घोषणा केली होती. अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने सध्या अनेक नागरीक गाडीत सीएनजी गॅस वापरत आहे, सीएनजी गॅसची किंमत सध्या ६६ रुपये इतकी आहे, या निर्णयामुळे एप्रिलपासून ही किंमत आणखी कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता आपल्याला आपला प्रवास अजूनच परवडणार आहे. याबाबत अनेक नागरिक मागणी करत होते. अखेर याबाबत आता निर्णय झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट फिस्कटले आहे. यामुळे मोदी सरकारवर टीका केली जात आहे. यातच रशिया आणि युक्रेन युद्धामुळे देखील मोठ्या प्रमाणावर अनेक वस्तू महाग झाल्या आहेत. खाद्यतेल देखील यामुळे वाढले आहे. यामुळे सामान्य लोक महागाई कमी करण्याची मागणी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
कधी नव्हे ते पुणे जिल्हात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी, काय आहेत कारणे, वाचा...
महागाईचा भडका! आता गँस, पेट्रोल, डिझेलनंतर ८०० औषधांचे दर वाढणार
ब्रेकिंग! PM kisan Yojna; पीएम किसान योजनेत मोठा बदल, शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
Published on: 26 March 2022, 03:51 IST