CNG Price: देशात महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाचे दर आणि गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. दुधाचेही दर २ रुपयांनी वाढले आहेत. मात्र मुबईकरांना (Mumbai) दुहेरी दिलासा मिळला आहे. कारण सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG)च्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे मुबईकरांना कुठेतरी दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
मुंबईकरांना आता किचनपासून ते कार-वाहनापर्यंत स्वस्तात गॅस मिळणार आहे. एमजीएलने मंगळवारपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी कपात केली आहे. नवीन दर आज, बुधवारपासून लागू झाले आहेत.
घरगुती नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर सीएनजी-पीएनजीच्या किमतीत घसरण झाली आहे. एमजीएलने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, सीएनजीची किंमत प्रति किलो 6 रुपयांनी कमी करण्यात आली आहे, तर पीएनजीच्या दरात प्रति मानक घनमीटर (SCM) 4 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मुंबईत आता CNG 80 रुपये प्रति किलो आणि PNG 48.50 रुपये प्रति SCM वर पोहोचला आहे.
शेतकऱ्यांना होणार दुप्पट फायदा! जमीनच नाहीतर जमिनीच्या वरही करता येणार शेती; वापरा ही पद्धत..
आता ग्राहकांची किती बचत होईल
किमती कमी केल्यानंतर ग्राहकांच्या बचतीत आणखी वाढ झाल्याचे एमजीएलने म्हटले आहे. वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या इतर इंधनांशी तुलना केल्यास सीएनजीच्या वापरावर 48 टक्के बचत होईल, तर एलपीजीमध्ये वापरल्या जाणार्या इतर स्रोतांपेक्षा पीएनजीवर स्वयंपाक करणे 18 टक्के स्वस्त असेल. त्यामुळे ग्राहकांची बचतही वाढणार आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीला त्यात वाढ झाली
एमजीएलने (MGL) ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढवले होते, ही एप्रिलपासूनची सहावी दरवाढ होती. त्यानंतर कंपनीने पीएनजीचे दर 4 रुपयांनी आणि सीएनजीचे दर 6 रुपयांनी वाढवले होते. तीच किंमत आता एक प्रकारे मागे घेण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनो सावधान! मुसळधार पावसात होऊ शकते शेतीचे मोठे नुकसान; बचावासाठी करा हे काम
रिक्षा युनियनचे नेते थंपी कुरियन यांनी किमतीतील कपातीचे स्वागत करताना रिक्षाचालकांसह मुंबईकरांसाठी हा चांगला निर्णय असल्याचे सांगितले. असे असतानाही आम्हाला रिक्षाचे किमान भाडे ५० रुपयांनी वाढवावे लागणार आहे. सध्या किमान भाडे 21 रुपये आहे.
फेब्रुवारी 2021 पासून टॅक्सी आणि ऑटोसाठी किमान भाडे स्थिर आहे, जेव्हा ते 3 रु. ने वाढले होते. त्यानंतर ऑटोचे किमान भाडे 18 रुपयांवरून 21 रुपये, तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरून 25 रुपये करण्यात आले.
मुंबईत किती सीएनजी वाहने आहेत
मुंबई महानगर प्रदेशात सध्या 8 लाखांहून अधिक सीएनजी वाहने कार्यरत आहेत. यामध्ये तीन लाख खासगी कार, ऑटो टॅक्सी आणि बसेसचाही समावेश आहे. सीएनजी वाहन चालवणे हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त तर आहेच पण त्यामुळे पर्यावरणाचेही कमी नुकसान होते. मुंबई मेट्रो क्षेत्रातील 18 लाख घरांमध्ये स्वयंपाकासाठी पीएनजीचा वापर केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण! पेट्रोल 84 रुपयांवर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...
सोने खरेदीदारांचे नशीब चमकले! सोने आणि चांदी इतक्या रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या नवे दर...
Published on: 17 August 2022, 10:25 IST