बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा तसेच शेतकऱ्यांना शेती संबंधित उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठबळ मिळावे यासाठी मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजना आणली गेली आहे. या योजना संबंधीचा निर्णय सात सप्टेंबर रोजी घेण्यात आला आहे.
जाणून घेऊ या योजने बद्दल महत्वाची माहिती
मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेअंतर्गत कृषीशी संबंधित प्रक्रिया उद्योग जसे कडधान्य, तेलबिया, नाशवंत फळ तसेच भाजीपाला अशा पिकांचा संबंधित प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी अनुदान दिले जाते. या प्रक्रिया उद्योगांना उभे करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून 35 टक्क्यांपर्यंत प्रकल्पांना अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून संबंधित प्रकल्पांना दहा लाख रुपये पर्यंतचे आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसंबंधी चा शासन निर्णय 7 सप्टेंबर रोजी घेण्यात आला असून तो आपण पाहू.
या योजनेसंबंधी चा शासनाचा निर्णय
- योजनासन 2021-22 मध्य महाराष्ट्रात राबवण्यासाठी सात लाख 50 हजार एवढ्या रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे
- यावर्षी जो निधी उपलब्ध करून देण्यात येईल तो प्रथमता सन 2018- 19 व 2019 -20 या वर्षातील प्रलंबित कामांसाठी अगोदर वापरण्यात यावा व नंतर ही प्रलंबित प्रकरणे निकाली निघाल्यानंतर उर्वरित निधी सन 2021 – 22 मधील प्रकल्पांसाठी वापरण्यात यावा असे सांगितले आहे.
- योजना सन 2021 -22 या वर्षात राबवण्यासाठी आयुक्त, कृषी आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी तर सहाय्यक संचालक ( लेखी ), कृषी आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
- शासन निर्णय दिनांक 20 जून 2017 मधील विहित केलेल्या तरतुदी नंतर सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी व त्यानुसार योजना सन 2021- 22 मध्ये राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालय स्तरावर निर्गमित करावेत अशा सूचना दिल्या आहेत.
Published on: 09 September 2021, 12:16 IST