Others News

कृषी विद्यापीठामध्ये सेवारत प्राध्यापक, शास्त्रज्ञ,अधिकारी- कर्मचारी वर्गांचे तसेच कृषि

Updated on 22 May, 2022 9:48 PM IST

शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे संकल्पनेतून आणि मार्गदर्शनात अकोला कृषि विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गासाठी विद्यापीठ स्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन गत काही वर्षांपासून करण्यात येत आहे. क्रिकेट, हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, यासह रांगोळी कथा गायन स्पर्धांचे आयोजन अकोला मुख्यालयी करण्यात येत होते. या स्पर्धांना मिळणारा उदंड प्रतिसाद लक्षात घेत कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी 

विद्यापीठांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गांना आपले कलागुण दर्शविण्याची तथा परस्पर सहकार्य एकोपा आणि मैत्रीची भावना जोपासण्याचे महत्वपूर्ण कार्य सफल होत आहे आता याच मालिकेत कृषी विद्यापीठाअंतर्गत शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देत विद्यापीठांतर्गत क्रिकेट महोत्सवाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य वसतिगृह अधीक्षक यांचे नेतृत्वात वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना करिता 3 ते 5 जून 2022 दरम्यान विद्यापीठाचे क्रीडांगणावर करण्यात येत आहे. " चीफ रेक्टर - T-10 क्रिकेट कॅम्पस ट्रॉफी 2022 " या क्रीडा महोत्सवाचे निमित्ताने अकोला कृषी विद्यापीठात शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळातील आपले कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली असून अधिकाधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

या स्पर्धेतील विजेता उपविजेता संघासह उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजांना आकर्षक बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले या स्पर्धांना मिळणारा उदंड प्रतिसाद लक्षात घेत कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे अंतर्गत अधिकारी-कर्मचारी वर्गांचे विद्यापीठस्तरीय सामन्यांचे आयोजन अकोला कृषी विद्यापीठातून सुरू झाले व आज ही मालिका अकोल्यासह परभणी कृषी विद्यापीठ,राहुरी कृषी विद्यापीठ, आणि दापोली कृषी विद्यापीठ स्तरावर राबवत राज्यातील चारही कृषीराज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे अंतर्गत अधिकारी-कर्मचारी वर्गांचे विद्यापीठस्तरीय सामन्यांचे आयोजन अकोला कृषी विद्यापीठातून सुरू झाले

 या क्रीडा महोत्सवाचे निमित्ताने अकोला कृषी विद्यापीठात शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळातील आपले कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली असून अधिकाधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील विजेता उपविजेता संघासह उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजांना आकर्षक बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले असून मा. विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाचे माध्यमातून आयोजित तथा भारतीय स्टेट बँक शाखा डॉ. पं दे कृ वि प्रयोजित या क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठांतर्गत मुख्य वस्तीगृह अधीक्षक यांच्यासह सर्वच वसतिगृहांची अधिक्षक त्यांचे सहकारी प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी गण अथक परिश्रम घेत आहेत.

English Summary: "Chief Rector T-10" cricket tournament organized at Akola Agricultural University!
Published on: 22 May 2022, 09:37 IST