Others News

भारतात आधार (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) हे दोन असे डॉक्युमेंट आहेत ज्याच्याविना भारतात कुठलेही काम करणे अशक्य आहे. या दोन्ही डॉक्यूमेंट ची सरकारी गव्हर्नमेंट (Government) तसेच गैर सरकारी (Non-governmental) कामात गरज पडते. आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँकिंग (Banking) कामात देखील अति महत्त्वाचे कागदपत्र आहेत.

Updated on 29 December, 2021 5:36 PM IST

भारतात आधार (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) हे दोन असे डॉक्युमेंट आहेत ज्याच्याविना भारतात कुठलेही काम करणे अशक्य आहे. या दोन्ही डॉक्यूमेंट ची सरकारी गव्हर्नमेंट (Government) तसेच गैर सरकारी (Non-governmental) कामात गरज पडते. आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँकिंग (Banking) कामात देखील अति महत्त्वाचे कागदपत्र आहेत.

भारत सरकारने आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य (Mandatory) केले आहे, यासाठी भारत सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे, जर आपणही अजून पॅनकार्डला आधार सोबत लिंक केले नसेल तर 31 मार्च 2022 च्या आत पॅन कार्ड आधार सोबत लिंक (Link) करून घ्या. अनेक लोकांना पॅन कार्ड आधार सोबत लिंक केले आहे की नाही याची माहिती नसते. म्हणूनच आम्ही अशा लोकांसाठी खास माहिती घेऊन आलो आहोत, आज आपण पॅन कार्ड आधार सोबत लिंक आहे की नाही ते कसे चेक करायचे याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घ्या याविषयी सविस्तर.

पॅन कार्ड आधार सोबत लिंक आहे की नाही यापद्धतीने करा चेक (Check if the PAN card is linked with Aadhaar)

  • पॅन कार्ड आधार सोबत लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपणास सर्वात आधी भारत सरकारच्या आयकर विभागाच्या www.incometax.gov.in या ऑफिशिअल वेबसाईट (Official Website) ला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर आपणासमोर एक पेज ओपन होईल तिथे आपणास Quick Links या सेक्शनमध्ये लिंक आधार स्टेटस (Link Aadhar Status) वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर पॅन आणि आधार नंबर फिल करून View Link Aadhar Status या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • आपण एवढे प्रोसेस केल्यानंतर आपणास समजून जाईल की आपले आधार पॅनसोबत लिंक आहे की नाही.
English Summary: check your pan card link with your aadhar or not learn about it
Published on: 29 December 2021, 05:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)