Others News

अलीकडे देशात इलेक्ट्रिक वाहनांची खपत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसेंदिवस पेट्रोलचे दर गगनाला भिडत असल्याने भारतीय बाजारात इलेक्ट्रिक बाईक मोठ्या प्रमाणात वापरात आणल्या जात आहेत. याच पार्श्‍वभूमीवर आज आपण भारतातील सर्वात स्वस्त दमदार मायलेजच्या आणि शानदार डिझाईन वाल्या स्कूटर विषयी जाणुन घेणार आहोत. आज आपण भारतीय बाजारात स्वस्तात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर ची यादी बघणार आहोत. मित्रांनो जर आपणास इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर आपण या यादीतून एखादी स्कूटर खरेदी करू शकता. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया देशात उपलब्ध असलेल्या पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या इलेक्ट्रिक स्कूटर.

Updated on 10 March, 2022 12:50 PM IST

Hero Electric Flash E2- भारतातील स्वस्त लिथियम-आयन बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जेव्हा पण बोल्ले जाते तेव्हा हिरोच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव नक्कीच घ्याव लागतं. हिरोची ही ई-स्कूटर 25 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. ही स्कूटर लो स्पीड सेगमेंटमध्ये कंपनीने उतरवली आहे. हिरोची ही ई-स्कूटर एकदा चार्ज केल्यास 65 किमी पर्यंत धावण्यात सक्षम असल्याचे सांगितले जाते शिवाय या स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4-5 तासाचा कालावधी लागतो. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 49 हजार 999 रुपये एवढी कंपनीने ठेवली आहे.

Ampere REO Elite- Ampere REO Elite या इलेक्ट्रिक स्कूटरची रचना Honda Dio सारखीच कंपनीने बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने या स्कूटर मध्ये प्रीमियम दिसणारा एलईडी हेडलॅम्प आणि टेललाइट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, फ्रंट ऍप्रन पॉकेट आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट सारखे अद्ययावत फीचर्स दिले आहेत त्यामुळे ही स्कूटर फीचर्स च्या बाबतीत अतिशय उत्तम असल्याचे सांगितले जाते. यासोबतच ही इलेक्ट्रिक स्कूटर 25 किमी प्रतितास वेगाने धावण्यात सक्षम असल्याचा दावा केला जातो. शिवाय ही स्कूटर लिथियम-आयन बॅटरी पॅकसह उपलब्ध करून दिली आहे. एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटर 60 किमी चालण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्कूटर ची एक्स शोरूम किंमत 43 हजार रुपये एवढी कंपनीने ठेवली आहे.

Hero Flash LA - हिरो कंपनीची ही इलेक्ट्रिक स्कूटर लो स्पीड सेगमेंटमध्ये खूपच विश्वसनीय असल्याचे सांगितले जाते. या स्कूटरच्या पॉवर आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्कूटरमध्ये BLDC हब मोटर देण्यात आली आहे, या मोटरची पॉवर 250W एवढे असल्याचे सांगितले जाते. या मोटरला उर्जा देण्यासाठी 48V. 28AH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.  शिवाय Hero Flash LA एकदा चार्ज केल्यास 50 किमी पर्यंत धावण्यास सक्षम असते. याशिवाय हिरो फ्लॅश एलए मध्ये डिजिटल स्पीडोमीटर, टेलिस्कोपिक सस्पेन्शन, मॅग अलॉय व्हील, एलईडी हेडलॅम्प, आरामदायी आसन आणि क्रॅश गार्ड यांसारखी फिचर्स कंपनीद्वारे देण्यात आले आहेत. हिरोच्या या एलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 43 हजार रुपये एवढी आहे.

English Summary: cheapest scooters in india know more about it
Published on: 10 March 2022, 12:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)