नवी मुंबई : Ujaas Energy या कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर Ujaas eSpa Li 60V ही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध बजेट विभागातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनी कमी बजेटमध्ये लाँग रेंज आणि हायटेक फीचर्स प्रदान करते. जर तुम्ही कमी बजेटमध्ये उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल, तर ही तुमच्यासाठी 50 हजारांच्या बजेटमध्ये एक उत्तम पर्याय ठरू शकते.
Ujaas eSpa Li 60V इलेक्ट्रिक स्कूटरविषयी महत्वपूर्ण माहिती
Ujaas eSpa Li 60V या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, तुम्हाला 60 V, 25Ah क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक मिळेल. यासोबतच या स्कूटरमध्ये 250W ची इलेक्ट्रिक हब मोटर बसवण्यात आली आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बसवलेला बॅटरी पॅक सामान्य चार्जरने 3 ते 4 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने 75 किमीची ड्रायव्हिंग रेंज दिली आहे. ब्रेकिंगसाठी, या स्कूटरला रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमवर आधारित पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक बसवले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Ujaas eSpa Li 60V इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये
Ujaas eSpa Li 60V इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, एलईडी टेल लाइट, रिमोट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अँटी थेफ्ट अलार्म, व्हील लॉकिंग यंत्रणा, फाईन्ड माय स्कूटर
डिजिटल घड्याळ, पास स्विच, एलईडी हेडलाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, लो बॅटरी इंडिकेटर यांसारखी फिचर्स देण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने 54,880 च्या सुरुवातीच्या किमतीत बाजारात आणली आहे आणि तिची ऑन-रोड किंमतही तितकीच आहे.
Published on: 08 May 2022, 05:01 IST