Others News

देशात सर्वत्र गेल्या अनेक दिवसांपासून इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. यातच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला गवसणी घालणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलवर धावणाऱ्या गाड्या कमी होत असून इलेक्ट्रिक वाहनांची खपत वाढली आहे. देशात जवळपास सर्वच नामांकित कंपनीने इलेक्ट्रिक वाहन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये एमजी मोटर इंडिया देखील समाविष्ट आहे.

Updated on 13 March, 2022 12:53 PM IST

देशात सर्वत्र गेल्या अनेक दिवसांपासून इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. यातच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला गवसणी घालणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलवर धावणाऱ्या गाड्या कमी होत असून इलेक्ट्रिक वाहनांची खपत वाढली आहे. देशात जवळपास सर्वच नामांकित कंपनीने इलेक्ट्रिक वाहन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये एमजी मोटर इंडिया देखील समाविष्ट आहे.

कंपनी लवकरच अनेक इलेक्ट्रिक कार भारतात लॉंच करण्याच्या तयारीत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, MG कंपनी देशात सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कंपनीने MG ZS EV ही इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉंच केली होती आणि आता येत्या काही दिवसात कंपनी भारतात सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार उपलब्ध करून देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही कंपनी देशात लवकरच सामान्य जनतेच्या खिशाचा विचार करत स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

हेही वाचा:-Best Mileage Bikes| 'या' आहेत भारतातील सर्वात दमदार मायलेज देणाऱ्या बाईक्स; जाणुन घ्या याविषयी

MG कंपनीची लवकरच लॉन्च होणारी इलेक्ट्रिक कार इतर इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत खूप छोटी असणार आहे. या कारला केवळ दोन दरवाजे असणार आहेत. शिवाय या गाडीमध्ये चार लोकांच्या बसण्याची जागा असणार आहे.

कंपनी ही फोर सीटर इलेक्ट्रिक कार पुढील वर्षापर्यंत भारतात लाँच करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. या इलेक्ट्रिक कारची (EV) लांबी 2,197 मिमी असणार आहे तसेच रुंदी 1,493 मिमी असेल आणि या कारची उंची 1,621 मिमी एवढी असणार आहे. या कारचा व्हीलबेस 1,940 मिमी एवढा असू शकतो असा अंदाज आहे.  एकंदरीत या कारचा आकारा देशातील सर्वात जास्त विक्री होणारी कार मारुती अल्टो सारखा असेल असे सांगितलं जातं आहे. ही कार चिनमध्ये लाँच झाली असून तिथे या कारला मोठी पसंती मिळत आहे आणि यामुळेच की काय कंपनी भारतीय ग्राहकांच्या सोयीसाठी ही कार लाँच करणार असं सांगितलं गेल आहे.

हेही वाचा:-लई भारी! फक्त 50 हजार रुपये भरा आणि घरी घेऊन जा Maruti Alto CNG; जाणून घ्या या ऑफर विषयी सविस्तर

MG कंपनीची नवीन इलेक्ट्रिक कार एबीएससह EBD, मागील पार्किंग सेन्सर्स आणि पुढच्या बाजूला ड्युअल एअरबॅगसह लाँच केली जाणार आहे. तसेच या इलेक्ट्रिक कारला कनेक्टेड कार तंत्रज्ञानही मिळू शकते. एक 20 kW-R बॅटरी पॅक या कार मध्ये बघायला मिळू शकते. जे की कारला एकदा चार्ज केल्यावर 150 किलोमीटरपर्यंतची रेंज देण्यास सक्षम असेल. असा अंदाज आहे की, नवीन MG EV ची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, जी भारतीय ग्राहकांच्या बजेटमध्ये असेल. जर कंपनीने या किंमतीसह ही कार लाँच केली तर ही कार भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते. सध्या, भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे Tata Tigor EV. या इलेक्ट्रिक कारची सुरवाती मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 11 लाख 99 हजार एवढी आहे.

English Summary: Cheapest electric car to arrive in India soon; Low cost life without petrol and diesel
Published on: 13 March 2022, 12:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)