मित्रांनो देशात सर्वत्र पेट्रोलचे भाव लक्षणीय वधारले आहेत, त्यामुळे देशात सर्वत्र चांगल्या मायलेज देणार्या बाईक्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक लोक इलेक्ट्रिक बाइक्स वापरण्यास पसंती दर्शवित आहे मात्र पेट्रोलचे भाव जरी आकाशाला गवसणी घालत असले तरीदेखील अनेक लोकांना पेट्रोल बाईक्स वापरणे पसंत असते त्यामुळे अशा लोकांसाठी आज आम्ही देशातील सर्वात स्वस्त आणि दमदार मायलेजच्या पेट्रोलबाईकची माहिती घेऊन आलो आहोत.
मित्रांनो जर आपणासही कमी किमतीत दमदार मायलेज वाली पेट्रोल बाईक खरेदी करायची असेल तर आम्ही ज्या तीन बाईकविषयी माहिती देणार आहोत त्यापैकी एक अवश्य खरेदी करू शकता. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊ या देशातील सर्वात स्वस्त तीन पेट्रोल बाईक्स.
हिरो एचएफ डीलक्स: देशातील सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणार्या यादीत आम्ही सर्वप्रथम हिरो एचएफ डीलक्स या गाडीला प्राधान्य दिले आहे, हिरो कंपनी ही देशातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपन्यांपैकी एक आहे. हिरो एचएफ डीलक्स ही कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी बाईक्स पैकी एक आहे. कंपनीने या गाडीला चार प्रकारात उपलब्ध करून दिले आहे. कंपनीने या गाडीत 97.2 सीसी इंजिन प्रोव्हाइड केले आहे, हे इंजिन 8.02 पीएस पावर जनरेटर करण्यास सक्षम असून 8.05 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीने या बाईकसाठी चार स्पीड गिअर बॉक्स उपलब्ध करून दिले आहेत. हे बाइक 83 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे, हे मायलेज एआरएआय द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 54 हजार 480 रुपयांपासून सुरू होते.
बजाज सिटी हंड्रेड: देशातील सर्वात स्वस्त आणि दमदार मायलेज देणार्या गाडींच्या यादीत आम्ही बजाज सिटी हंड्रेड या बाईकला दुसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. बजाज ही देशातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीच्या बाईक आपल्या स्टायलिश लूकमुळे आणि दमदार मायलेज मुळे ओळखल्या जातात. बजाज सिटी हंड्रेड देखील आपल्या मायलेज मुळे विशेष ओळखली जाते. कंपनीने या बाईकला केवळ एका व्हेरीयंट मध्ये उपलब्ध केले आहे. कंपनीने या गाडीसाठी 102 सीसी इंजिन प्रोव्हाइड केले आहे, हे इंजिन 7.9 p.s. पावर जनरेट करु शकते, तसेच हे इंजिन 8.34 एन एम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचे सांगितले जाते. ही गाडी 74 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 51 हजार रुपयांपासून सुरु होते.
हिरो एचएफ 100: आम्ही या यादीत हिरो एच एफ हंड्रेड या बाईक ला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. हिरो कंपनीची स्प्लेंडर नंतर सर्वात जास्त विक्री होणारी बाईक म्हणून हिरो एच एफ हंड्रेड ओळखली जाते. ही बाईक आपल्या स्टायलिश लुक साठी आणि दमदार मायलेज साठी विशेष ओळखली जाते. कंपनीने या गाडीत 97.2 सीसी इंजिन उपलब्ध करून दिले आहे. हे इंजन 8.36 पी एस पावर जनरेट करण्यास सक्षम असून 8.05 Nm टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीने या गाडीला 4 स्पीड गिअर बॉक्स दिले आहेत. कंपनीच्या मते हे गाडी 74 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे. या गाडीची सुरवातीची एक्स शोरूम किंमत 51 हजार 200 रुपये एवढी कंपनीने ठेवली आहे.
Published on: 21 February 2022, 10:49 IST