भारतात आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही अति महत्त्वाचे कागदपत्रे म्हणून ओळखले जातात. पॅन कार्ड भारतात सर्व वित्तीय कामांसाठी एक महत्त्वाचे कागदपत्रे बनले आहे. पॅन कार्ड शिवाय भारतात कुठल्याच बँकेत खाते खोलले जाऊ शकत नाही. पॅन कार्ड बँकेत खाते खोलण्यासाठी, आयकर भरण्यासाठी, बँकेत पैशांचे व्यवहार करण्यासाठी, केवायसी करण्यासाठी, भारत सरकारच्या कल्याणकारी योजनेचे लाभ घेण्यासाठी तसेच अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामात पॅन कार्ड अनिवार्य असते. मात्र अशा या महत्त्वाच्या डॉक्युमेंट मध्ये अनेकदा काही त्रुटी राहून जातात. पॅन कार्डमध्ये नाव तसेच जन्मतारीख बदलण्यासाठी अथवा अपडेट करण्यासाठी आता आपणास कुठल्याच केंद्रावरती हजेरी लावण्याची आवश्यकता भासणार नाही. आता आपण घरबसल्या अगदी काही मिनिटात ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड मध्ये आपली माहिती अद्ययावत करू शकणार आहात.
आज आपण पॅन कार्ड मध्ये जन्म तारीख कशी अपडेट करायची या महत्वपूर्ण माहिती विषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर. आज आपण आपल्या पॅन कार्ड मध्ये चुकीची जन्मतारीख प्रविष्ट केली गेली असल्यास कशा तऱ्हेने घरबसल्या अगदी काही मिनिटात बदलू शकतात, तसेच आपण पॅन कार्ड अगदी काही मिनिटात ऑनलाईन पद्धतीने कसे डाऊनलोड करू शकतो याविषयी जाणून घेऊया. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पॅन कार्ड मध्ये जन्मतारीख बदलण्यासाठी भारत सरकारच्या आयकर विभागाद्वारे आपल्याकडून नाममात्र शुल्क देखील वसूल करण्यात येतो.
पॅन कार्ड मध्ये जन्मतारीख कशी चेंज करायची
मित्रांनो जर आपल्या पॅन कार्ड मध्ये देखील जन्मतारीख चुकीची प्रविष्ट केली गेली असेल आणि पॅन कार्ड मध्ये जन्मतारीख बदलायची असेल तर आपणास सर्वप्रथम भारत सरकारच्या आयकर विभागाच्या NSDL च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Online Application for Correction or Changes to PAN Data या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर अॅपलिकँट या कॅटेगिरी मध्ये जावे लागेल. तदनंतर HUF (Hindu Undivided Family) अथवा वैयक्तिक यापैकी एका पर्यायाला सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर स्क्रीनवर ओपन झालेला फॉर्म योग्यरीत्या भरावा लागेल.
तसेच यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. यासोबतच आपणास आपला फोटो देखील अपलोड करावा लागणार आहे. यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर आपणास यासाठी ठराविक शुल्क अदा करावा लागेल यासाठी आपण डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डचा उपयोग करून पेमेंट करू शकता. तिथे आपणास एक एकनॉलेजमेंट नंबर दिसेल तो नोट करून घ्या भविष्यात आपले स्टेटस चेक करण्यासाठी हा नंबर उपयोगी पडतो.
Published on: 28 January 2022, 06:45 IST