भारतात दिवसेंदिवस आधार कार्डचे महत्त्व वाढत आहे, हे एक प्रमुख दस्ताऐवज आहे. आधार कार्ड हे प्रत्येक सरकारी तसेच द्वारे सरकारी कामात उपयोगात आणले जाते. आधार कार्ड बँकेत खाते खोलण्यापासून तर पैसे काढण्यापर्यंत सर्व्याच कामात गरजेचे डॉक्युमेंट ठरले आहे. भारतात आधार कार्डविना साधे एक सिम कार्ड सुद्धा काढता येत नाही. यावरून आधारकार्डचे महत्व आपले लक्षात आलेच असेल. अशा या अतिमहत्वाच्या कागदपत्रात अनेक लोकांच्या काही त्रुट्या देखील असतात. अनेक लोकांच्या आधार कार्डमध्ये जन्मतारखा चुकीच्या झाल्या आहेत अशा लोकांसाठी आज आम्ही एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत, जर आपल्याही आधार कार्ड मध्ये जन्मतारीख चुकीची प्रविष्ट केली गेली असेल तर आपण आपल्या आधार कार्डवरची जन्मतारीख घरबसल्या अगदी काही मिनिटात बदलू शकता.
आधार कार्ड जारी करणारी संस्था युआयडीएआय नुसार केवळ डिक्लेअर किंवा अनव्हेरिफायड जन्मतारखेला ऑनलाइन बदलले जाऊ शकते. जन्मतारीख ऑनलाईन अपडेट करण्यासाठी आपणास जन्मतारखेचा पुराव्याची कॉपी स्कॅन करून ऑनलाइन जमा करावी लागेल. याविषयी यूआयडीएआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वर माहिती जारी केली आहे. आपण Https://Ssup.Uidai.Gov.In/Ssup/ या दिलेल्या लिंक वर जाऊन आधार कार्ड वरील जन्मतारीख ऑनलाईन बदलू शकता. युआयडीएआय ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, आता सेल्फ सर्विस अपडेट पोर्टल च्याद्वारे कोणीही व्यक्ती डेट ऑफ बर्थ अपडेट करू शकतो.
किती लागते फी
युआयडीएआय ने अधिक माहिती देताना सांगितले की, ऑनलाइन पोर्टलवर कोणतीही माहिती अपडेट करण्यासाठी आपणास पन्नास रुपये प्रति अपडेट शुल्क अदा करावा लागेल.
तसेच आपणास कुठलेही माहिती अपडेट करण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. जर आपणास आधार कार्ड विषयी अधिक माहिती हवी असेल, किंवा काही तक्रार असेल तर आपण 1947 या नंबर वर कॉल करू शकता. Help@Uidai.Gov.In किंवा या इमेल आयडीवर ई-मेल करून तक्रार करू शकता.
Published on: 21 December 2021, 09:33 IST