कोरोना या जागतिक महामारीच्या महागुरूने साधे सरळ व सुखी जीवन जगण्यासाठी पैसा श्रीमंती पेक्षा शुद्ध हवा स्वच्छ परिसर निरोगी सुदृढ शरीर व रोगप्रतिकारक क्षमता असलेले शरीर हे महत्वाचे असल्याचा मूलमंत्र दिला.
दिवाळी सण उत्सव आनंदाचा.
शेतकरी राजाच्या घरात धनलक्ष्मी काही काळासाठी का होईना आनंदी असते . दिवाळी म्हणजे आनंदी स्वप्नांचा पिटारा असून नियोजनबद्ध पद्धतीने काटकसर करून कायदा, सूचना व दक्षतेचे पालन केल्यास नक्कीच तुमची दिवाळी आपल्या परिवारासोबत आनंदी जाईल. चार दिवसांवर दिवाळी आलेली प्रत्येकाने खूप काही स्वप्न पाहिलेले असतात . लग्न झालेल्या मुलीला घेऊन येणे.
जावई येणार, शहरात राहणारा सुपुत्र ,सून नातवंडे येणार त्यांच्यासाठी गोड धोड पदार्थ कपडेलत्ते फटाके घराची रंगरंगोटी असे स्वप्न प्रत्येक कुटुंब प्रमुख पहात असतो. दिवाळीच्या तेजोमय दिव्यांचा प्रकाश एक सारखा जरी असला तरीपण असंख्य दिव्याप्रमाणे प्रत्येकाचे स्वप्न विभिन्न असतात. त्यांची पूर्तता प्रत्येक व्यक्ती आपापल्यापरीने करीत असतो. शेतकरी राजा धान्य विकून व्यापारी व्यवसाय करून कर्मचारी पगार पेन्शन वर पत्रकार जाहिरातीवर अवलंबून असतो . स्वप्न सर्वांची जेमतेम सारखीच असतात . स्वप्न पूर्तता ही त्यांच्या आवक वर निर्भर असते . दिवाळी साजरी करण्यासाठी फटाके , नवे वस्त्र गोड पकवान्न, रोषणाई , घराची रंगरंगोटी व इतर स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या ऐपतीनुसार खर्च केला जातो खर्च 10000 असो किंवा एक लाख असो समाधान हे सारखेच असते, दिवाळी सणाची खरेदी व बाजार हा मोठा आर्थिक उलाढालीचा विषय असून खरेदी करताना थोडी काळजी थोडी दक्षता घेण्या सोबतच पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा . पोलिस पण एक माणूसच त्याला पण घर परिवार त्यांचे स्वप्न असतात .
घरचे सगळे कामे करून तो अहोरात्र तुम्हाला सेवा देतो . बाजारात रोडवर गर्दीच्या ठिकाणी तुमच्या सोबत अनुचित प्रकार घडू नये म्हणून तटस्थ उभा राहतो,.महत्त्वाचं म्हणजे मग काय झालं.? तो पगार घेतो त्याचं कर्तव्य आहे. असं म्हणणाऱ्यांना आत्मचिंतन समुपदेशनाची गरज.!!
मित्रांनो खालील सूचनांचे पालन काटेकोरपणे केल्यास नक्कीच तुमची दिवाळी आनंददायी जाईल.
प्रथमता कोरूना चे नियम आपले कर्तव्य समजून पाळावे , जमाव गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर चा वापर करावा ,सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळावे, शेतकरी बांधवांनी बाजारात धान्य विक्री केल्यावर पूर्ण पैसे बाजारात घेऊन खरेदी करणे टाळावे ,त्यापेक्षा गरजेपुरते पैसे घेऊन दिवाळीची खरेदी करावी, अडत्या किंवा व्यापाऱ्याला आपण विकलेल्या मालाचे पैसे आपल्या खात्यात जमा करून देण्याचे सांगावे, गुरेढोरे खरेदी-विक्री च्या ठिकाणी पैशाचा व्यवहार काळजीपूर्वक करावा कारण अशा ठिकाणी उचले चोर लफंगे पाळत ठेवून असतात ,तुमची एक चूक तुमच्या स्वप्नांचा चुराडा करू शकते.
मद्यपान करून खरेदी व्यवसाय इतर आर्थिक व्यवहार टाळावा.
घरून बाजारात दिवाळीच्या खरेदीला येताना महिलांना सोन्याची आभूषणे आणण्याचे टाळावे, असा समज द्यावा . घरी सदस्य नसल्यास घराची देखरेख किंवा लक्ष देण्याचे आपल्या शेजारील विश्वासू व्यक्तीला विनंती करावी . दुचाकी वाहनावर येताना हेल्मेटचा वापर करावा. महिलांना व्यवस्थित काळजीपूर्वक बसण्याची सूचना देण्यात यावी. वाहने सावकाश चालवा अपघात अनर्थ टाळावा, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून व्यवहार करणे टाळावे, गरजेपुरतीच खरेदी करावी पैशाचा अपव्यय टाळावा ,जास्तीत जास्त तेलाचे तुपाचे दिवे दिव्यांचा वापर करावा, विजू रोशनाई टाळावी आपले मोबाईल पर्स व सोन्याची आभूषणे यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवावे कर्णकर्कश फटाक्यांचा वापर टाळावा. या सोबतच सर्वांना दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा
लेखक - शेख मुख्तार
Published on: 30 October 2021, 04:20 IST