Others News

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे इतके पेट्रोलचे दर गगनाला पोहोचले आहेत.

Updated on 24 February, 2022 12:06 PM IST

 सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे इतके पेट्रोलचे दर गगनाला पोहोचले आहेत.

त्यामुळे ग्राहकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे बऱ्या प्रमाणात वळताना दिसत आहे. इलेक्ट्रिक बाइक तसेच इलेक्ट्रिक कार्सबाजारात येऊ लागले आहेत.तसेच या इलेक्ट्रिक स्कूटर वापरणे देखील परवडण्याजोगे आहे. याला प्रोत्साहन म्हणून भारत सरकारने देखील इलेक्ट्रिक स्कूटर वर भरीव अनुदान देऊ करत आहे. स्कुटी चा विचार केला तर  स्कुटी वापरण्याचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे.खास महिलांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा पर्याय एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. हे प्लॅटफॉर्म म्हणजे एक  ॲप असून  त्या ॲपचं नाव क्रेडारअसे आहे

या ॲप वर स्त्रियांना परवडतील अशा किमतीत मध्ये वापरलेल्या बाईक खरेदी करण्यासाठी आघाडीच्या टू व्हीलर ची यादी तपासता येणार आहे. या वापरलेल्या टू-व्हीलर्स या उत्तम मेंटेनन्स केलेले असल्यामुळे ग्राहकांच्या संपूर्ण गरजा पूर्ण होणार आहेत.भारतीय बाजारपेठेमध्येउपलब्ध असलेल्या उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर ची संपूर्ण यादी यावर दिलेली आहे. तसेच वेगवेगळ्या  इलेक्ट्रिक स्कूटर या  ॲप वर  पाहायला मिळतील व तुम्हाला हव्या त्या बजेटमध्ये मिळणारी स्कूटर निवडण्याची मुभा असल्याचे क्रेडआर चे सीईओ शशिधर नंदिगम यांनी सांगितले.

भारतीय बाजारपेठेतील या आहेत टॉप 10 इलेक्ट्रिक स्कूटर

 एंपियर झील,  ओला एस 1, टीव्हीएस आय क्यूब इलेक्ट्रिक, अथर 450एक्स, हीरो इलेक्ट्रिक फोटोन,बजाज चेतक, बाउन्स इन्फिनिटी ईवन,  एंपियर व्ही 48, ओकिनावा रीज+ त्याची स्कूटर आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 40 हजार ते एक लाख 40 हजार रुपये पर्यंत आहे. (स्रोत-abpमाझा)

English Summary: cerdaar app give more selection of electric scooter for women
Published on: 24 February 2022, 12:06 IST