Others News

जर आपण सध्याचे सीएनजी गॅसच्या दराचा विचार केला तर जवळपास पेट्रोल आणि डिझेलच्या जवळपासचे दर पोहोचले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना खूप मोठा आर्थिक फटका बसत असून यावर नियंत्रण यावे यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून त्यानुसार आता उद्योगधंद्यांना जो काही नॅचरल गॅस करतो तो आता दिल्ली येथील इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आणि मुंबईतील महानगर गॅस सारख्या सिटी गॅस ऑपरेटरना पुरवण्याचा निर्णय घेतले असल्यामुळे आता सीएनजी आणि पीएनजीच्या वाढलेल्या किमती कमी होण्यास मदत होऊ शकते.

Updated on 11 August, 2022 6:35 PM IST

नक्की वाचा:दिलासादायक! पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, पेट्रोल 84.10 तर डिझेल 79.74 रुपयांना; जाणून घ्या नवे दर...

 याबाबतची पेट्रोलियम मंत्रालयाची अधिसूचना

 पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली असून त्यामध्ये म्हटले आहे की, जे काही गॅस वितरक आहे त्यांना घरगुती उत्पादित गॅसचे वाटप वाढवण्यासाठी पूर्वीचे आदेशात सुधारणा करण्यात आली आहे.

यासाठी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ गॅस आणि मुंबई महानगर गॅस लिमिटेड सारख्या शहरा मधील गॅस वितरण कंपन्यांसाठी वाटप 17.5 दशलक्ष घन मीटर प्रति दिन वरून आता 2.078 दशलक्ष घनमीटर करण्यात आले आहे. आता यामध्ये केलेली वाढ सीएनजी आणि पीएनजीचा जो काही पुरवठा आहे त्याच्यासाठी ची 94% मागणी पूर्ण करेल.

नक्की वाचा:7th Pay Commission: DA वाढविण्याबाबत सरकारकडून मोठी अपडेट; जाणून घ्या

 सीएनजी आणि पीएनजीच्या दरात आतापर्यंतची वाढ

मुंबईत सीएनजी गॅस आणि पीएनजी गॅसच्या दरात तीन ऑगस्ट रोजी वाढ करण्यात आली होती व त्यानुसार प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत चार रुपये प्रति एससीएम इतकी वाढ करण्यात आली होती.

नक्की वाचा:अरे वा! पुढच्या वर्षापासून रस्त्यावर गाड्या धावतील इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर, शेतकऱ्यांना होईल फायदा

English Summary: central goverment taking decision on control rate of cng and png gas
Published on: 11 August 2022, 06:35 IST