केंद्र सरकारने सध्या विविध क्षेत्रामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा सपाटा सुरू ठेवला असून अलीकडे सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात देखील चार टक्क्यांनी वाढ केली आहे. यासारखे बरेच महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या घेतले जात आहेत.
या अनुषंगाने अशीच एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत असून केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने असाच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून चार सामान्य विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच एक अनोखी भेट दिली आहे.
या चार विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात केली 12% वाढ
केंद्रीय अर्थमंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या चार विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सुमारे 12 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. एवढेच नाही तर हा वाढलेला पगार ऑगस्ट 2017 पासून लागू होणार आहे.
केंद्र सरकार आता 2017 पासून या चारही विमा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच वर्षाची थकबाकी देणार आहे.
यासंबंधीच्या 14 ऑक्टोबर 2022 रोजीच्या राजपत्रातील अधिसूचनेद्वारे म्हटले आहे की, या योजनेला सामान्य विमा सुधारणा योजना 2022 असे म्हटले जाऊ शकते. ऑगस्ट 2022 च्या देय वेतनाची सुधारणा कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर अवलंबून बदलत्या पगाराच्या स्वरूपात असेल.
ऑगस्ट 2017 पासून पगारातील वाढ लागू होणार
या कर्मचाऱ्यांच्या पगारातील ही वाढ ऑगस्ट 2017 पासून लागू आहे आणि त्यावेळी जे कर्मचारी कंपन्यांमध्ये काम करत होते त्यांना लागू होणार आहे. त्यामुळे आता अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेले पाच वर्षाची थकबाकी मिळणार आहे असे सरकारने सांगितले आहे.या चार विमा कंपन्यांमध्ये नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या चार विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
जर नियमानुसार पाहिले तर सरकारी बँका आणि विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये दर पाच वर्षांनी सुधारणा करण्यात येते. परंतु सध्या सामान्य विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात बदल करण्यात आला आहे मात्र त्याला पाच वर्ष उशीर झाला.
नक्की वाचा:पोरांनो पळा रे! पोलिसांच्या ११ हजार ४४३ पदभरतीस मान्यता; पहिल्यांदा होणार...
Published on: 17 October 2022, 02:36 IST