केंद्र सरकारने वाहन भंगार धोरण जाहीर केले आहे कारण देशातील जुनी वाहने भंगारात पाठविण्यात यावी. परंतु आता नेमकी कोणत्या प्रकारची वाहने भंगारात जातील,याबाबत काही निकष ठरविण्यात आले आहेत.
याबाबतची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी ट्विटर द्वारे दिली
यासाठी देशात साडेचारशे ते पाचशे नोंदणीकृत वाहन स्क्रापिंग सुविधा केंद्र उपलब्ध करण्यात येणार आहेत. याबाबतचे नियमावली गडकरी यांनी जाहीर केली आहे. मोटर वाहन कायदा 1989 मधील नियम 52 नुसार ज्या वाहनांचे नोंदणीचे नूतनीकरण होणार नाही अशी वाहने भंगारात काढले जातील.
तसेच फिटनेस प्रमाणपत्र मिळालेले नाही, एखाद्या दंगलीमध्ये नुकसान झालेली, जळालेली वाहने, अपघात झालेली वाहने, एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेली वाहने जी वाहन मालकाने च भंगार म्हणून जाहीर केलेली आहे अशी वाहने भंगारात काढता येतील तसेच जप्त किंवा बेवारस पडलेल्या वाहनाचा यात समावेश होऊ शकतो.
सरकारचे नवीन नियमावली
- केंद्र किंवा राज्यसरकार ने कालबाह्य केलेली वाहने,जी सरप्लस असतील किंवा दुरुस्त करणे शक्यच नाही अशा वाहनांना ही भंगारात काढता येईल.
- खाणकाम,महामार्ग बांधकाम,शेती,विज कारखाने किंवा विमानतळा सारख्या प्रकल्पांमध्ये वापरल्या ली कालबाह्य वाहने मालकाच्या संमतीने भंगारात काढता येतील. याशिवाय एखादे वाहन मालकाच्या इच्छेने देखील स्क्रॅप करण्यासाठी पाठवू शकतो.
- उत्पादना दरम्यान रिजेक्ट केलेली वाहने किंवा टेस्टिंग अथवा प्रोटोटाइप वाहने तसेच डीलर पर्यंत नेताना खराब झालेली वाहने देखील स्क्रॅप करता येतील. याशिवाय विक्री न झालेली वाहने देखील कंपनीच्या मंजुरीनेस्क्रॅप करता येतील.
माहिती स्त्रोत - लोकमत
Published on: 31 August 2021, 11:36 IST