मेणबत्ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मेणबत्ती ला जागतिक बाजारपेठेमध्ये खूपच मागणी आहे.जर बाजारपेठेचा अभ्यास केला तर सध्याच्या मागणीनुसार 50 टक्केच पुरवठा हा मेणबत्ती व्यवसायाच्या माध्यमातून केला जातोय.
या व्यवसायात जगामधील वेस्टइंडीज हा देश आघाडीवर आहे. मेणबत्ती मध्ये वेगळे प्रकार असून सध्याच्या काळात सुशोभित मनमोहक मेणबत्त्या भेटवस्तू म्हणून देखील दिल्या जातात. घरामध्ये उजेडासाठीसनाही तर रोमांटिक कॅण्डल, पाण्यावर तरंगणाऱ्या मेणबत्त्या तसेच वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकाराचे मेणबत्त्या अगदी आपल्या घरातील शोकेस मधे ठेवण्याच्या प्रकारा पर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. मेणबत्ती व्यवसाय हा मोठ्या आणि लहान किंवा गृह उद्योग म्हणून केला जाऊ शकतो. मेणबत्ती चा व्यवसाय हा वेगवेगळ्या पद्धतीने सुरू करता येऊ शकतो. आपल्याकडे असलेल्या प्रत्यक्ष विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून आपण आपल्या मालाची विक्री करू शकतो. या लेखात आपण मेणबत्ती व्यवसाय विषयी सविस्तर माहिती घेऊ.
मेणबत्ती व्यवसायासाठी लागणारे भांडवल आणि साधने……
जर तुम्हाला मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा अगदी कमी भांडवलात सुरु करायचा असेल तर तुम्ही तो गृह उद्योग या स्वरूपात सुरू करू शकता त्यासाठी मेणाची गरज भासते. त्यासोबतच मोल्डस,सुगंधी द्रव्य, विक्स,रंग आणि मेणवितळण्यासाठी भांड इत्यादी साहित्य लागते. एखाद्या प्रत्यक्ष विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला त्यांचे एक किटखरेदी करावी लागते. जर स्वतंत्रपणे स्वतःचे व्यवसाय सुरू करायचा असेल तर स्वतः फंड उभा करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला बँक अथवा एमएसएमईसारख्या संस्थांची मदत मिळू शकते.
मेणबत्ती व्यवसायातील महत्त्वाच्या गोष्टी……
- मेणबत्ती व्यवसाय सुरू करण्याअगोदर एखाद्या चांगल्या संस्थेतून प्रशिक्षण घेणे कधीही चांगले असते.
- आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या सलोख्याने आणि कौशल्य आणि आपल्या मालाची विक्री करा किंवा आपल्या माला साठी एखाद्या ठिकाणी विक्री साठी जागा निवडून तेथून विक्री करा किंवा वेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या प्रदर्शन मध्ये भाग घेऊन आपल्या मालाला बाजारपेठ मिळवून द्या.
- स्वतःची एखादी वेबसाइट तयार करून घ्या. ऑनलाइन मार्केटिंग च्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वतःचा उत्पादन पोचवता येते. मुख्य म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःच्या उत्पादनाचे मार्केटिंग करू शकता.
- तुमच्या व्यवसायाच्या नावाने बिजनेस कार्ड छापून घ्यावी. प्रत्येकाला जेव्हा भेटाल तेव्हा तुमचे कार्ड समोरच्याला द्यावे.
- फ्लायर्स अथवा पोम्प्लेट हासुद्धा एक चांगला पर्याय आहे. आपले प्रॉडक्ट लोकल मार्केटमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो.
- आपल्या परिसरातील हॉटेल, स्पा, कार्पोरेट कंपनीला अॅप्रोच करा.
- या व्यवसायामध्ये जर स्वतःची जागा निर्माण करायची असेल तर थोडा संयम बाळगायला हवा. कारण कुठलाही चांगला उद्योग एका रात्रीत उभा राहत नसतो हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे डोके शांत ठेवून तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचाल.
Published on: 22 January 2022, 06:45 IST