Others News

स्टेट बँक ऑफ इंडिया हे भारतातील अग्रगण्य बँक आहे. स्टेट बँक ग्राहकांसाठी कायमच वेगवेगळ्या आकर्षक योजनाराबवित असते. एवढेच नाही तर ग्राहकांच्या ठेवीच्या सुरक्षेविषयी कायम ग्राहकांना सतर्क करीत असते.

Updated on 27 May, 2022 1:23 PM IST

 स्टेट बँक ऑफ इंडिया हे भारतातील अग्रगण्य बँक आहे. स्टेट बँक ग्राहकांसाठी कायमच वेगवेगळ्या आकर्षक योजनाराबवित असते. एवढेच नाही तर ग्राहकांच्या ठेवीच्या सुरक्षेविषयी कायम ग्राहकांना सतर्क करीत असते.

याच पार्श्वभूमीवर अशीच एक  कर्ज योजना देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी आणली असून तुम्हीही बँकेच्या ग्राहक असाल व बँकेच्या अटी पूर्ण करत असाल तर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला देखील कर्ज मिळू शकते.

 काय आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची योजना

 स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी योनो अॅप रियल टाईम एक्सप्रेस क्रेडिट नावाची एक योजना किंवा ऑफर देऊ केली आहे. या ऑफरचा अंतर्गत  बँकेच्या काही अटी पूर्ण करत असलेल्या ग्राहकांना स्टेट बँकेच्या योनो अँपच्या माध्यमातून 35 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन मिळू शकणारआहे व त्यासाठी कुठलाही कागदपत्रांची आवश्यकता नाही.

मात्र यासाठी ची बँकेची खास अट अशी आहे की, संबंधित ग्राहक हा पगारदार असला पाहिजे व त्याचे सॅलरी अकाऊंट हे स्टेट बँकेत असणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य सरकार तसेच डिफेन्स  मध्ये नोकरी करणाऱ्या ग्राहकांना यापुढे पर्सनल लोन साठी बँकेच्या शाखेत जाण्याचे सुद्धा गरज नाही.

अगदी तुम्हाला  डिजिटल पद्धतीने सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर कर्ज दिले जाईल. या डिजिटल प्रक्रियेमध्ये सिबिल स्कोर तपासण्या व्यतिरिक्त तुमची पात्रता,  तसेच लोनची रक्कम मंजूर करणे इत्यादी कामे डिजिटल पद्धतीने केले जाणार आहेत. यासंबंधी स्टेटबँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी म्हटले की,एक्सप्रेस क्रेडिट उत्पादन बँकेशी संबंधित ग्राहकांना डिजिटल, त्रास फक्त आणि पेपरलेस कर्जत प्रक्रियेचा अनुभव घेण्यास सक्षम ठरेल.

 कोणते ग्राहक या ऑफर साठी  कर्जासाठी पात्र राहतील?

1- ज्या पगारदार ग्राहकांचे सॅलरी अकाऊंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे ते पात्र राहतील.

2- संबंधित ग्राहकाचे कमीत कमी प्रतिमहा उत्पन्न आहे पंधरा हजार असणे गरजेचे आहे.

2- केंद्र शासन, राज्य सरकार, निमशासकीय, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम  इत्यादींमध्ये नोकरी करणारे कर्मचारी बँकेच्या या ऑफर साठी पात्र राहतील.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:महिला शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे? कृषिमंत्री दादा भुसे यांचे सूचक वक्तव्य

नक्की वाचा:Petrol Diesel Price: तेल कंपन्यानी जारी केलेत पेट्रोल-डिझेलचे आजचे नवीन दर; जाणुन घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

नक्की वाचा:शिल्लक ऊसाला हेक्टरी 75 तर ज्या शेतकऱ्यांचा उस जळीत करून गाळप केला त्यांना 25 हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्याची मागणी

English Summary: can you get 35 lakh personal loan from sbi if you government employees
Published on: 27 May 2022, 01:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)