जीवनामध्ये तुम्ही किती पैसा कमवता याला महत्व नसून तुम्ही कमवलेला पैसा कशा प्रकारे गुंतवता याला खूप महत्त्व आहे. कारण पैशाला कायम कामाला लावणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे जीवनामध्ये प्रत्येक जण जी काही बचत करत असतो ती चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करतो आणि गुंतवणूक करताना गुंतवणूक सुरक्षित राहावी आणि चांगला परतावा मिळावा एवढी अपेक्षा गुंतवणूकदारांची असते. गुंतवणुकीचे जर पर्याय पाहिले तर बरेच असून यामध्ये आता बरेच जण शेअर मार्केट किंवा एखाद्या बँकेच्या चांगल्या मुदत ठेव योजनांमध्ये पैसे गुंतवतात.
परंतु जर गुंतवणूक करून योग्य परतावा हवा असेल तर तुम्हाला गुंतवणूक देखील योग्य ठिकाणीच करणे गरजेचे असते. गुंतवणुकीच्या जर आपण वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला तर चांगला परतावा देण्यासाठी एसआयपी हा एक चांगला गुंतवणुकीचा मार्ग आहे. याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये याबद्दल माहिती घेणार आहोत.
एसआयपीमध्ये करा गुंतवणूक
योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते व या दृष्टिकोनातून इतर गुंतवणूक पर्याय व्यतिरिक्त एसआयपी हा एक पर्याय खूप महत्वपूर्ण आहे. यामध्ये जर तुम्ही दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर खूप मोठा फंड या माध्यमातून उभारू शकतात.
कारण जर तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चक्रवाढ व्याजचा फायदा मिळून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. साधारणपणे तुम्ही यामध्ये एका महिन्याला एक हजार रूपयाची गुंतवणूक केली तरी देखील तुम्हाला खूप मोठा रिटन या माध्यमातून मिळू शकतो.
एक हजार रुपयाचे कॅल्क्युलेशन
जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही कमीत कमी 1000 रुपयांची एसआयपी ने तुमची गुंतवणूक सुरू करू शकतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे एक हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून तुम्ही एक कोटी रुपयांपेक्षा जास्त फंड मिळवू शकतात. फक्त याकरिता तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये गुंतवणे गरजेचे आहे.
कारण मागील काही वर्षांचा विचार केला तर म्युच्युअल फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीतून 20 टक्के किंवा त्यापेक्षा देखील जास्त परतावा मिळाला आहे. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयाची गुंतवणूक वीस वर्षांकरिता एसआयपी मध्ये केली तर 2.4 लाख रुपये जमा होतात. जर याला पंधरा टक्के वार्षिक परतावा पकडला तर त्यानुसार वीस वर्षात 15 लाख 16 हजार रुपये इतकी रक्कम होते.
जर 15 टक्क्यांऐवजी 20 टक्क्यांचा वार्षिक परतावा मिळाला तर हा फंड 31.61 लाख इतका होतो. तर यामध्ये आपण एसआयपी चे कॅल्क्युलेटर नुसार विचार केला तर 1000 रुपयांची दरमहा गुंतवणूक केली तर वार्षिक 20% परताव्यासह या गुंतवणुकीच्या परिपक्वतेवर तुम्हाला 86.27 लाखांचा निधी मिळतो.
तर तीस वर्षाच्या गुंतवणुकीवर 20% नुसार तब्बल 2 कोटी 33 लाख 60 हजार रुपये इतका निधी तुमचा जमा होतो. कारण गुंतवणूकदाराला या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर चक्रवाढव्याजाचा फायदा मिळत असतो.
गुंतवणूक करताना नेहमी गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी.
Published on: 09 August 2023, 11:20 IST