केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रदीर्घ काळाचे प्रतीक्षा आज संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार लवकरच मोठी बातमी देऊ शकते.
मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी कॅबिनेट बैठकीनंतर सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची घोषणा करू शकते. खरेतर फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी सरकारवर दबाव असून फिटमेंट फॅक्टर वाढविल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर वापरला जातो.केंद्र सरकारने जर फिटमेंट फॅक्टर वाढवला तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होईल.
किती वाढेल वेतन?
फिटमेंट फॅक्टर वाढवल्यानंतर किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपये आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याची मागणी केंद्र सरकारी कर्मचारी संघटनांनी फार काळापासून केली आहे. सध्याचा विचार केला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57 टक्के पगार मिळत आहे.
जर त्यामध्ये 3.68टक्के वाढ केली तर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात आठ हजार रुपयांची वाढ होईल. याचा अर्थ केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपये होईल.
सर्व प्रकारच्या भत्त्यामध्ये होईल वाढ
फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 टक्क्यांपर्यंत वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन सव्वीस हजार रुपये होईल. जर तुमचे पगार 18000 रुपये असेल तर भत्ते वगळून तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टर नुसार 46 हजार 260 रुपये ( 18000 ×2.57=46260) मिळतील.
जर आता फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर पगार 95 हजार 680 रुपये (26000×3.68=95680) होईल.
महत्वाच्या बातम्या
Published on: 25 May 2022, 08:44 IST