देशातील कामगार सुधारणांसाठी केंद्रसरकार लवकरच चार नवीन कामगार संहिता लागू करणार असूनया कामगार संहितेच्या नियमांमध्ये बदल झाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार,त्यांच्या रजा तसेच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युईटी च्या नियमांमध्ये देखील बदल होणार आहेत.
सध्याच्या नियमानुसार कर्मचाऱ्याने पाच वर्ष सेवा दिली तर त्याला ग्रॅच्युईटी मिळते. परंतु लवकरच त्यांची ही सक्ती आता संपणार असून एक वर्षाची सेवेनंतर देखील कर्मचाऱ्यांना आता ग्रॅज्युटी मिळेल. या बाबतीत अजून सरकारकडून कुठल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
नक्की वाचा:Goverment Scheme:शेतकऱ्यांचा शेतमाल भरेल आता उडान,केंद्राची ही योजना ठरेल लाभदायी
ग्रॅच्युइटी मिळण्यासाठीची अट
एकाच कंपनीमध्ये जास्त काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन, पेन्शन तसेच भविष्य निर्वाह निधी व्यतिरिक्त ग्रॅच्युइटी दिली जाते. ग्रॅच्युईटी पेमेंटची हमी विहित सूत्रानुसार दिली जाते.
त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रति महिन्याला ग्रॅच्युईटीचे पैसे कापले जातात. कर्मचाऱ्यांचा पगार मधून एक छोटासा भाग ग्रेच्युटी साठी कट केला जातो.
परंतु त्यातला मोठा हिस्सा हा संबंधित कंपनीकडून दिला जातो. सध्याच्या नियमांचा विचार केला तर, एखाद्या कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत पूर्ण पाच वर्षे काम केले तर त्याला ग्रॅच्युईटी मिळते. त्यांनी पाच वर्षे पूर्ण केली नाही तर ग्रॅज्युटी मिळत नाही.
नक्की वाचा:करा 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक आणि मिळवा दरमहा दीड लाख रुपये पेन्शन, वाचा सविस्तर तपशील
आताचा नियम
सध्या जर एखाद्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना साडे चार वर्षांपेक्षा जास्त म्हणजे चार वर्षे 7 महिने पूर्ण केले तर अशा परिस्थितीत शेवटचे वर्ष कर्मचाऱ्याचे पूर्ण वर्षे मानले जाते.
म्हणजेच जर कर्मचारी मागील वर्षात सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ काम करत असेल तर त्याला कंपनीकडून ग्रॅच्युईटी दिली जाते. तसेच मृत्यू किंवा अपंगत्व असल्यास ग्रॅच्युईटी ची रकमेसाठी पाच वर्षे सेवा पूर्ण करणे आवश्यक नाही.
लवकरच हा नियम येण्याची शक्यता
नवीन कामगार संहिता लागू झाल्यानंतर पाच वर्षाची अट रद्द होऊन एक वर्ष केली जाण्याची शक्यता आहे.अजून तरी याबाबत सरकारकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही मात्र लवकरच हा नियम लागू होण्याची शक्यता आहे.
Published on: 18 July 2022, 08:21 IST