Others News

मित्रांनो ह्या धावपळीच्या जीवनात बाईक हि जीवनावश्यक झाली आहे. प्रत्येक व्यक्तीला बाईकची गरज हि भासत असते. पण अनेक लोकांना बाईक हि जास्त किमतीमुळे विकत घेता येत नाही तसेच अनेक जण हे बाईकला ऍव्हरेज नसते म्हणून बाईक हि अफ्फॉर्ड करू शकत नाही.

Updated on 21 November, 2021 8:51 PM IST

मित्रांनो ह्या धावपळीच्या जीवनात बाईक हि जीवनावश्यक झाली आहे. प्रत्येक व्यक्तीला बाईकची गरज हि भासत असते. पण अनेक लोकांना बाईक हि जास्त किमतीमुळे विकत घेता येत नाही तसेच अनेक जण हे बाईकला ऍव्हरेज नसते म्हणून बाईक हि अफ्फॉर्ड करू शकत नाही.

म्हणून आज आम्ही एक अशा बाईक विषयी सांगणार आहोत जी बाईक कमी किमतीत उपलब्ध आहे तसेच तिला चांगले मायलेज देखील आहे. आम्ही सांगत आहोत हिरोची स्प्लेंडर प्रो ह्या बाईकबद्दल. हि हिरोची बाईक नवीन 70000 च्या आसपास रोड प्राईस मध्ये उपलब्ध होते. किमतीत हा राज्यानुसार तसेच पासिंग नुसार बदल असू शकतो.

 मित्रांनो जर आपल्याकडे नवीन बाईक घेण्यासाठी एवढी मोठी रक्कम नसेल तर आम्ही आज आपणास अशी एक ऑफर सांगणार आहोत ज्याद्वारे आपण हि हिरोची स्प्लेंडर प्रो बाईक केवळ 38000 रुपयात आपली बनवु शकता. मित्रांनो हि किमत हि सेकंड हॅन्ड बाईकची आहे.

मित्रांनो जर आपल्यालाही सेकंड हॅन्ड बाईक घ्यायची असेल तर हि ऑफर आपल्यासाठी खुप फायदेशीर आहे. हिरो स्प्लेंडर प्रो ह्या बाईकवर हि ऑफर दिली आहे बाईक्स 24 ह्या वेबसाईटने. मित्रांनो हि वेबसाईट सेकंड हॅन्ड बाईकची खरेदी विक्री करते. ह्या साईटने स्प्लेंडर प्रो ह्या गाडीवर 38000 रुपयाची किंमत लावली आहे.

 5 वर्ष जुनी आहे गाडी

बाईक्स 24 ह्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या बाईकचे मॉडेल 2017 ह्या वर्षातील आहे आणि ह्या गाडीची ओनरशिप हि पहिली आहे. हि स्प्लेंडर प्रो बाईक आतापर्यंत 4500 किमी एवढी चालली आहे आणि हि गाडी दिल्ली येथील आहे. हि गाडी DL7C RTO ऑफिसमध्ये नोंदणीकृत आहे.

 

 गाडीवर एका वर्षाची वॉरंटी मिळणार

मित्रांनो ह्या बाईकवर एका वर्षाची वॉरंटी कंपनी देणार आहे. Bikes 24 हि कंपनी काही अटींसह एक वर्षाचे वॉरंटी देणार आहे. कंपनी वॉरंटी समवेत सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी देखील देणार ​​आहे. ह्या पॉलिसि अंतर्गत जर आपल्याला गाडी सात दिवसाच्या आत आवडली नाही तर आपण ती परत देखील करू शकता

टीप: आर्टिकलं मध्ये दिलेली माहिती हि केवळ वाचक मित्रांच्या माहितीसाठी आहे. आपण जास्त माहितीसाठी प्रत्येक्ष संबंधित कंपनी/व्यक्ती/साईट इत्यादी संपर्क करू शकता. कृषी जागरण हि कुठलीही वस्तू प्रमोट करत नाही

English Summary: can buy this old bike in 38000 thousand thsts give you strong mileage
Published on: 21 November 2021, 08:51 IST