सध्या उन्हाळ्याची सुरुवात झाली असून उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे.त्यामुळे अनेक जणांची लगबग टेबल फॅन किंवा सिलिंग फॅन तसेच एअर कुलर घेण्यासाठी सुरू झाली आहे. अशातच एकदिलासादायक बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे अगदी कोणालाही एसी खरेदी करता येईल अशा किमतीत पोर्टेबल एसी बाजारात उपलब्ध झाला आहे. या पोर्टेबल एसीची किंमत जर ऐकले तर तुमचा विश्वास नाही बसणार. परंतु हे खरे आहे.तसेच तुम्ही या छोट्या पोर्टेबल कूलिंग एस सी च्या शोधात असल्यास तुम्हाला या लेखातील माहिती उपयोगी पडेल. हा मिनी पोर्टेबल एसी टेबल किंवा मुलांच्या स्टडी टेबल वर ठेवण्यासाठी खूपच उपयोगी पडू शकतो. हा कूलिंग डिवाइस खूपच छोटे असून खूपच गारवा देण्याचे काम चांगल्या पद्धतीने करते.हा पोर्टेबल एसी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून खरेदी करू शकतात.विशेष म्हणजे याची किंमत 400 रुपयांपासून सुरू होते तर दोन हजार रुपयांपर्यंत आहे.
हा पोर्टेबल एसी वेगवेगळ्या डिझाइन्स आणि आकारांमध्ये उपलब्ध करण्यात आला असून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मॉडेल खरेदी करू शकतात.
हा पोर्टेबल एसी कसे काम करतो?
हा एसी वापरण्यासाठी ड्राय आईस चा वापर करावा लागतो किंवा तुम्ही थंड पाण्याचा देखील यामध्ये वापर करू शकतात. त्यामुळे तुम्हाला चांगला गारवा मिळेल आहे तुम्ही बसलेले खोलीतही थंडावा तयार होईल. हा एसी वापरणे अगदी सोपे आहे. एवढेच नाही तर त्यासाठी विजेचा देखील कमी वापर होतो.
जे लोक बसून काम करतात त्यांच्यासाठी हा पोर्टेबल एसी खूपच उत्तम पर्याय ठरू शकतो. विजेचा कमी वापर होत असल्याने पैशांचे देखील चांगली बचत होते. त्यामुळे हा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी हा पोर्टेबल एसी तुम्हाला मदत नक्कीच करेल यात शंका नाही.
Published on: 12 March 2022, 07:53 IST