Others News

राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने बैठका होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल रात्री पुन्हा एकदा उशीरा बैठक झाली आहे.

Updated on 12 July, 2023 9:28 AM IST

राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने बैठका होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल रात्री पुन्हा एकदा उशीरा बैठक झाली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा हा तिढा सोडवण्याठी बैठकांचं सत्र सुरु होतं. सोमवारी रात्रीही मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक पार पडली होती.

मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ही बैठक सुरु होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी फडणवीस यांची भेट घेतली. पण या भेटींमधूनही तिढा सुटला नव्हता. त्यानंतर मंगळवारी रात्री तिन्ही नेते पुन्हा एकत्र आले. मात्र यावेळी सकारात्मक चर्चा होऊन एकमत झाल्याची माहिती आहे.

राज्याच्या काही भागात आज मुसळधार पाऊस; वाचा आजचा हवामान अंदाज...

सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं खातेवाटप होणं महत्त्वाचं आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप रखडले असले तरी त्या मंत्रायलयात दालन आणि बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी असताना देण्यात आलेला देवगिरी बंगला देण्यात आला आहे. तसंच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर त्यांचं कार्यालय असणार आहे.

छगन भुजबळ यांना सिद्धगड, हसन मुश्रीफ यांना विशाळगड, दिलीप वळसे पाटलांना सूवर्णगड आणि धनंजय मुंडे यांना प्रचितगड बंगला देण्यात आला आहे. इतर मंत्र्यांना सुरुची इमारतीत शासकीय निवासस्थान दिलं गेलं आहे.

English Summary: Cabinet expansion became the formula! What accounts will NCP get?
Published on: 12 July 2023, 09:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)