Others News

देशात मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ बघायला मिळत आहे, या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात मायलेज वाल्या गाड्यांची खपत वाढली आहे. एलेक्ट्रिक वेहिकल्स आणि अधिक मायलेज देणार्‍या गाड्यांची खपत दिवसेंदिवस वाढत आहे. टू व्हीलर सेगमेंटमध्ये देखील अधिक मायलेजच्या गाड्या मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत. देशात अनेक अग्रगण्य मोटार निर्माता कंपन्या अधिक मायलेज देणार्‍या गाड्यांची निर्मिती करत असतात, यामध्ये टीव्हीएस आणि बजाज या दोन कंपन्या शीर्षस्थानी आहेत. आज आपण बजाज कंपनीच्या सर्वात जास्त सेल होणारी आणि दमदार मायलेज साठी ओळखली जाणारी एव्हरग्रीन टू व्हीलर बजाज प्लेटिना विषयी जाणून घेणार आहोत. बजाज प्लेटिना ही गाडी आपल्या दमदार मायलेज आणि स्वस्त किमतीमुळे मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंत बनली आहे.

Updated on 14 February, 2022 10:51 PM IST

मित्रांनो जर आपण बजाज प्लेटिना ही गाडी शो रूम मध्ये खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर आपणास जवळपास साठ हजार रुपये एक्स शोरूम किंमत या गाडीसाठी मोजावी लागणार आहे. परंतु जर आपल्याकडे एवढी मोठी रक्कम नसेल तर चिंता करू नका आज आम्ही आपल्यासाठी खास ऑफर घेऊन आलो आहोत ज्याद्वारे आपण बजाज प्लेटिना ही दमदार मायलेज वाली गाडी अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. या ऑफर विषयी जाणून घेण्याआधी आपण सर्वप्रथम बजाज कंपनीच्या सर्वात जास्त असेल होणाऱ्या प्लेटिना गाडी विषयी माहिती जाणून घेऊया.

बजाज प्लॅटिना ह्या बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, या गाडीमध्ये 102 cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे, हे इंजिन 7.9 PS ची पॉवर आणि 8.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते, या गाडीला 4 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. या बजाज प्लॅटिना बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमवर कंपनीने चांगले काम केले आहे. प्लॅटिना बाईकच्या पुढच्या चाकामध्ये ड्रम ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. बजाज प्लेटिना गाडी 80 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देत असल्याचा कंपनीने दावा केला आहे, एआरएआयने देखील ही बाईक 80 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देत असल्याचे सांगितले आहे.

मित्रांनो, दमदार मायलेज आणि शानदार फीचर्स वाली प्लॅटिना गाडी आपण एक्स शोरूम किंमतिच्या अर्ध्या किमतीत खरेदी करू शकता. मित्रांनो तर आपल्याकडे बजाज प्लेटिना ही गाडी नवीन शोरूम खरेदी करण्यासाठी पैसे नसतील तर आपण बजाज प्लेटिना गाडी सेकंड हॅन्ड खरेदी करू शकता. बाईक्स 24 या सेकंड हॅन्ड खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटने बजाज प्लेटिना गाडीवर एक शानदार ऑफर आणली आहे. या वेबसाईटवर बजाज प्लेटिना गाडी मात्र 33 हजार रुपयात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. Bikes24 नुसार 33 हजार रुपयात मिळणारी ही गाडी 2015 या वर्षाची आहे.

या बजाज प्लेटिना गाडीवर कंपनीने काही अटी व शर्तीनुसार एका वर्षाची वारंटी देखील दिली आहे एवढेच नाही तर कंपनीने या गाडीवर 7दिवसाची मनी बँक गॅरंटी देखील दिली आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की कंपनीने सात दिवसाची जी मनी बँक गॅरंटी दिली आहे त्यासाठी देखील कंपनीने काही अटी लावून दिल्या आहेत. जर आपण ही गाडी खरेदी केली आणि आपणास ती गाडी पसंत आली नाही तर आपण सात दिवसाच्या आत ती गाडी कंपनीला रिटर्न करू शकता आणि आपले पैसे वापस घेऊ शकता, मात्र यासाठी कंपनीने सांगितलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करणे अनिवार्य आहे.

English Summary: Buy bajaj platina bike at 33000 on bikes 24
Published on: 14 February 2022, 10:51 IST