Others News

अनेकांनी नोकरी सोडून व्यवसायात लक्ष घातले आहे. यातून चांगला पैसा देखील कमवत आहेत. तुम्हालाही घरबसल्या व्यवसाय करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. आज आपण अशाच एका व्यवसायाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Updated on 26 September, 2022 2:34 PM IST

अनेकांनी नोकरी सोडून व्यवसायात (Business Start) लक्ष घातले आहे. यातून चांगला पैसा देखील कमवत आहेत. तुम्हालाही घरबसल्या व्यवसाय करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. आज आपण अशाच एका व्यवसायाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

आपल्याला माहिती आहे की सरकारने प्लास्टीकच्या (Plastic) वापरावर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत प्लॅस्टिक बंदीनंतर पॅकिंगला पर्याय म्हणून कार्टनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

तुम्ही कार्टन व्यवसाय (Carton business) करून चांगला नफा मिळवू शकता. विशेष म्हणजे ऑनलाइन शॉपिंगचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळं कार्टन व्यवसाय तुम्हाला अधिक फायदा मिळवून देऊ शकतो.

पीएम किसान योजनेत मोठा बदल; आता 'या' शेतकऱ्यांनाच मिळणार 12 वा हप्ता

कार्टन बॉक्सची वाढती मागणी

सध्या लहान वस्तूंच्या ऑनलाइन वितरणामुळे, पुठ्ठ्याच्या बॉक्सचा वापर देशात खूप वाढला आहे. मोबाईलपासून टीव्हीपर्यंत, चपलांपासून ते काचेच्या वस्तू किंवा किराणा सामानापर्यंत, पुठ्ठ्याचे बॉक्स मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. त्यामुळे कार्टनच्या व्यवसायात चांगले यश मिळू शकते.
इतका येईल खर्च

या व्यवसायासाठी तुम्हाला सुमारे 5,500 चौरस फूट जागा लागेल. जर तुमच्याकडे तेवढी जागा उपलब्ध असेल, तर तुम्हाला मशीन घेण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. सेमी ऑटोमॅटिक मशिनच्या (Automatic machine) सहाय्याने मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला सुमारे 20 लाख रुपये खर्च करावे लागतील.

शेतकऱ्यांनो रब्बी कांदा लागवड करताना 'या' पद्धतीचा वापर करा; होईल चांगली कमाई

पूर्णपणे स्वयंचलित मशीन खरेदी करण्यासाठी, तुम्हाला सुमारे 50 लाख रुपये गुंतवावे लागतील. एकदा पूर्ण सेटअप झाल्यानंतर, तुम्हाला जवळच्या पॅकेजिंग एजन्सीशी (Packaging Agency) संपर्क साधावा लागेल आणि त्यांना तुमचे बॉक्सचे नमुने दाखवावे लागतील.

अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर घेऊन कार्टन बनवू शकता. महत्वाचे म्हणजे जर तुम्ही चांगल्या ग्राहकांशी करार केलात तर दरमहा 4 ते 6 लाख रुपये सहज तुम्ही कमवू शकता.

महत्वाच्या बातम्या 
LIC ची भन्नाट योजना; फक्त 2 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार 48 लाख रुपयांचा परतावा
शेतकऱ्यांसाठी खास योजना; आता पोस्ट ऑफिसच्या किसान विकास योजनेत शेतकऱ्यांचा पैसा होणार डबल
भारीच की! ही एकच भाजी सर्व आजारांवर करतेय मात; एकदा खाऊन पहाच...

English Summary: Business Start home Earnings Rs 5 lakh per month
Published on: 26 September 2022, 02:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)