Small Business Idea 2022: तुम्हाला तुमचा स्वतःचा छोटा व्यवसाय (Small Business) सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम व्यवसायाची भन्नाट आयडिया (Small Buisness Idea) घेऊन हजर झालो आहोत. हा व्यवसाय सुरू (Business) करून तुम्ही खुप चांगली कमाई करू शकता, कारण की या व्यवसायाला बारामाही मागणी असते. विशेषत: उन्हाळी हंगामात त्याची मागणी थोडी वाढते.
आता तुमच्या मनात हेच चालू असेल की असा कोणता व्यवसाय आहे, ज्याची लोकांना इतकी गरज आहे. हा व्यवसाय साबण निर्मितीचा व्यवसाय आहे, ज्याची मागणी बाजारात कधीही कमी होतं नाही. उन्हाळा पावसाळा अन हिवाळा तिन्ही हंगामात याला लई डिमांड असते. चला तर मग जाणुन घेऊया की हा व्यवसाय कसा सुरू करता येईल.
किती गुंतवणूक करावी लागेल
साबण बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 1000 चौरस फूट जागा लागेल. याशिवाय साबण बनवण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारच्या मशीन्सची आवश्यकता लागणार आहे. साबण बनवण्यासाठी तुम्हाला एक्सट्रूडर मशीन, डाय, मिक्स मशीन कटिंग मशीन लागेल.
व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही कामगारांची देखील आवश्यकता भासणार आहे. लक्षात ठेवा की साबण फॅक्टरी चालवण्याचा परवाना सर्वप्रथम तुम्हाला घ्यावा लागेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे 6 ते 7 लाखांचा खर्च येऊ शकतो.
गुणवत्तेची विशेष काळजी घ्या
कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुम्हाला उत्पादनांवर सर्वाधिक लक्ष द्यावे लागते, कारण तुमचा माल चांगला नसेल तर लोकांना तो आवडणार नाही. जर तुम्ही तुमच्या मालाचे योग्य मार्केटिंग केले तर तुम्हाला चांगला नफाही मिळेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंगही करू शकता.
सरकार मदत करेल
साबण हे असे उत्पादन आहे, ज्याचा वापर गावोगावी केला जातो. साबण व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत सरकारकडून कर्जही घेऊ शकता. तुम्ही खाजगी सरकारी बँकेत जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकता, यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे देखील द्यावी लागतील.
Published on: 13 May 2022, 10:59 IST