नवी मुंबई : मित्रांनो जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एका कायम मागणी मध्ये असलेल्या व्यवसायाविषयी माहिती सांगणार आहोत. या व्यवसायाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा व्यवसाय अतिशय कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो. मित्रांनो तुम्ही हा व्यवसाय केवळ 2 ते 3 हजारांपर्यंत सुरू करू शकता
मित्रांनो आता तुम्ही म्हणणार एवढ्या कमी पैशात व्यवसाय कसा सुरु करता येऊ शकतो. मात्र मित्रांनो 3 हजारात हा व्यवसाय सुरु केला जाऊ शकतो. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे पाणीपुरीचा व्यवसाय. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही बंपर नफा कमवू शकता. तरुणांमध्ये पाणीपुरी हे स्ट्रीट फूड खूप प्रसिद्ध आहे. यामुळे निश्चितच हा व्यवसाय सुरू करून चांगली मोठी कमाई केली जाऊ शकते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया हा व्यवसाय कसा सुरु करायचा.
महत्वाच्या बातम्या:
Business Idea : फक्त 10 हजारात सुरु करता येतो 'हा' व्यवसाय; कमाई होते लाखों रुपयात
Business Idea 2022 : घरातच सुरु करा हा बिजनेस आणि कमवा लाखों; वाचा याविषयी
पाणीपुरी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल
पाणीपुरी बनवण्यासाठी तुम्हाला पीठ आणि रवा लागेल. कारण बाजारात दोन प्रकारच्या पाणीपुरीला विशेष पसंती दिली जाते, काहींना पिठाने बनलेली पाणीपुरी खायला आवडते, तर काहींना रव्याची पाणीपुरी आवडते. विशेष म्हणजे तुम्हाला या दोन्ही गोष्टी बाजारात सहज मिळतील. जर तुम्हाला ते होलसेलमध्ये मिळवायचे असेल तर तुम्ही उत्पादक किंवा घाऊक विक्रेत्याशी बोलू शकता, जेणेकरून तुम्हाला थोडे स्वस्त मिळेल. याशिवाय, मसाला तयार करण्यासाठी तुम्हाला बटाट्याची अधिक प्रमाणात आवश्यकता भासणार आहे.
पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण खर्च
जर तुम्हाला 4000 पाणीपुरी बनवण्याची असेल तर यामध्ये तुम्हाला एकूण 38 किलोग्राम पिठाची आवश्यकता भासणार आहे. या व्यवसायात तेलाची किंमत, पिठाच्या किंमत इत्यादीं जोडून 3,500 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे.
पाणीपुरीचा व्यवसाय कसा सुरू करायचा
सर्वप्रथम तुम्हाला पाणीपुरीच्या व्यवसायासाठी एक छानस नाव ठेवावं लागणार आहे. पाणीपुरीची किंमत किती असेल, ते तुमच्या शहरानुसार ठरवा. सुरुवातीला कमी पाणीपुरी बनवा. नंतर जसजसे ग्राहक वाढतील तसेतसे तुम्ही पाणीपुरी अधिक बनवु शकता. नेहमी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा. चिंचेचे पाणी बहुतेक लोकांना आवडते, म्हणून तुम्ही हे पाणी अधिक वापरू शकता. यासाठी तुम्ही लोटगाडी देखील घेऊ शकता.
Published on: 10 May 2022, 06:02 IST