तुम्ही सुद्धा कुठलातरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत आहात का? परंतु कोणता व्यवसाय करावा हे तुम्हाला सुचत नसेल तर या लेखात आम्ही तुम्हाला एका चांगले व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत.या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही महिन्यासाठी चांगला पैसा कमाऊ शकता. तो व्यवसाय म्हणजे ऑनलाइन फ्युएलम्हणजे डिझेल विक्री करणे हा होय.या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.
या व्यवसायासाठी इंडियन ऑईल कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, पेट्रोलियम प्रोसेस इंजिनियरिंग सर्विसेस को. सारख्या तेल कंपनी मदत करतात.याशिवाय तुम्ही सरकारकडून देखील या व्यवसायासाठी मदत घेऊ शकता. सरकार द्वारा मान्यता प्राप्त स्टार्टअपपेपफ्युएल्सडॉट कॉमहेस्टार्ट अप सरकार मान्य आहे.पेपफ्युएल्सचा इंडियन ऑइल सोबत थर्ड पार्टी अग्रीमेंट आहे.हे डोअर टू डोअर डिलिव्हरीसाठी आहे.या ॲपद्वारे ग्राहक ऑनलाइन या मेसेज द्वारे ऑर्डर करतात.
हा व्यवसाय कसा सुरु करावा?
नोएडा येथील टीकेंद्र, प्रतीक आणि संदीप या तिघांनी मिळूनहा स्टार्टअप सुरू केला आहे.हा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांच्या वार्षिक टर्नओव्हर शंभर कोटींच्या आसपास आहे.याविषयी बोलताना टिकेंद्र म्हणाले की, हा व्यवसाय सुरू करण्याआधी त्यांनी खूप प्रमाणात संशोधन केले तसेच घराघरात जाऊन लोकांशी चर्चा केली तसेच बऱ्याच प्रमाणात ऑनलाइन फीडबॅक घेतला.फीडबॅक घेतल्यानंतरत्यांना कळले की यासाठी ऑनलाईन ऍप असणे गरजेचे आहे.तसे पाहता पेट्रोल-डिझेलची ऑनलाइन डिलिव्हरी चा व्यवसाय सुरू करणेफार जोखमीचे आहे.याविषयी बोलताना टीकेंद्रम्हणाले की,2016 पर्यंत देशात पेट्रोल डिलिव्हरीसाठी परमिशन नव्हती. सरकारने आतायाबाबतीत परमिशन दिली आहे.
या तिघांनी इंडियन ओईल कॉपोरेशन,भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, पेट्रोलियम प्रोसेस इंजीनियरिंग सर्विस को. यासारख्या पेट्रोल कंपन्यांकडे त्यांनी प्रस्ताव पाठवला तसेच त्यांच्या स्टार्टर ची आयडिया त्याने पीएमओकडे सुद्धा दिली होती. काही दिवसानंतर त्यांना पीएमओ कडून उत्तर आले. तसेच त्यांनी फरिदाबाद येथील इंडियन ऑइल यांच्यामार्फत देखील या व्यवसायाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट पाठवायला सांगितला होता. त्यानंतर त्यांनी हा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट इंडियन ऑइल ला पाठवला व त्यानंतर त्यांना अप्रूप होईल मिळाले व त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.(साभार- न्यूज 18 हिंदी )
Published on: 11 September 2021, 12:44 IST