आत्ता सध्या अनेक लोक नोकरीच्या त्रासाला कंटाळले आहेत. आपली शेती बरी असा विचार करणारे बहुतेक लोक आहेत. कोरोनाच्या काळात अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे वळाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशी आयडिया देणार आहोत, ज्यातून तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीत महिन्याला लाखो रुपये कमवू शकणार आहात.
हिवाळा, उन्हाळा, पाऊस अशा प्रत्येक ऋतूत खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण ते अगदी आवडीने खातात. या उत्पादनाची मागणी गावापासून शहरापर्यंत कायमच असते.
आज आपण काजू शेतीबद्दल बोलत आहोत. गेल्या काही काळापासून देशात कृषी क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. आता देशातील शेतकरी पारंपरिक शेती सोडून नगदी पिकांवर अधिक भर देत आहेत. सरकारही आपल्या स्तरावरून सातत्याने शेतकऱ्यांना सतत जागरूक करत आहे. त्याची झाडे लावून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
काजू हे ड्राय फ्रूट म्हणून ओळखळे जाते. झाडाची लांबी 14 मीटर ते 15 मीटर किंवा त्याहून अधिक असू शकते. झाडे 3 वर्षात फळ देण्यास तयार होतात. काजूशिवाय त्याची सालेही वापरली जातात. त्याच्या सालेपासून पेंट आणि स्नेहक तयार केले जातात. काजूची लागवड अत्यंत फायदेशीर मानली जाते. काजूसाठी लाल वालुकामय चिकणमाती चांगली मानली जाते.
भारतात काजूची शेती
काजूच्या एकूण उत्पादनात आपल्या देशाचा वाटा 25 टक्के आहे. केरळ, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये अल्प प्रमाणात काजूची लागवड केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या :
Kisan Credit Card: शेतकरी शेतीव्यतिरिक्त "या" कामांसाठी KCC कडून कर्ज घेऊ शकतो
कामाची बातमी : गांडुळ शेती व्यवसाय सुरू करा, कमवा दरमहा 5 लाख रुपये
काजूतून मिळणारे उत्पन्न
एक हेक्टरमध्ये 500 काजूची झाडे लावता येतात. तज्ज्ञांच्या मते एका झाडापासून 20 किलो काजू मिळू शकतात. एका हेक्टरमध्ये 10 टन काजूचे उत्पादन होते. त्यानंतर प्रक्रियेचा खर्च येतो. बाजारात काजू 1200 रुपये किलोने विकला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही जास्त प्रमाणात रोपे लावलीत तर तुम्ही एक दिवस करोडपती नक्की व्हॉल.
महत्त्वाच्या बातम्या :
सरकारचा मोठा निर्णय! आता घरपोहच मिळणार रेशन
सर्वसामान्यांना चटका! रशिया युक्रेन युद्धामुळे खाद्य तेलाचे दर गगनाला
Published on: 29 March 2022, 03:39 IST