Others News

New Business Idea : जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय (Business) सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो अलीकडे नवयुवक व्यवसायाकडे (Business News) अधिक वळत असल्याचे चित्र आहे. नोकरीपेक्षा अनेकांना आपला स्वतःचा व्यवसाय (Business Idea 2022) सुरु करायचा असतो. अशा परिस्थितीत आज आम्ही आमच्या वाचक मित्रांसाठी एका बिझनेस आयडिया (Business Idea) विषयी माहिती घेऊन आलो आहोत.

Updated on 09 September, 2022 8:48 AM IST

New Business Idea : जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय (Business) सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो अलीकडे नवयुवक व्यवसायाकडे (Business News) अधिक वळत असल्याचे चित्र आहे. नोकरीपेक्षा अनेकांना आपला स्वतःचा व्यवसाय (Business Idea 2022) सुरु करायचा असतो. अशा परिस्थितीत आज आम्ही आमच्या वाचक मित्रांसाठी एका बिझनेस आयडिया (Business Idea) विषयी माहिती घेऊन आलो आहोत.

मित्रांनो आज आपण कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा एलईडी बल्बच्या व्यवसायाची (Led Bulb Making Business) माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही देखील एलईडी बल्बचा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायात तुम्ही कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवू शकता. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बिझनेस आयडिया विषयी काही महत्त्वाच्या बाबी.

मित्रांनो, बदलत्या काळानुसार बल्बच्या वापरात अनेक बदल झाले आहेत. आजकाल लोक पिवळ्या बल्बऐवजी एलईडी बल्ब वापरू लागले आहेत. त्यामुळे विजेची बचत होते आणि बिलही कमी येते. अशा परिस्थितीत नवयुवक उद्योजकांसाठी त्यामुळे एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. एलईडी बल्बच्या वाढता वापर लक्षात घेता एलईडी बल्ब तयार करण्याचा व्यवसाय सुरू केल्यास निश्चितच त्यातून चांगली कमाई होणार आहे.

तुम्ही एलईडी बल्ब तयार करून त्याच्या विक्रीतून मोठा नफा कमवू शकता. सध्या बाजारात एलईडी बल्बला मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही प्रशिक्षण घेऊन घरी हा बल्ब बनवू शकता. या व्यवसायाची सर्वात मोठे विशेषता म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त 50 हजार रुपयांची छोटी गुंतवणूक करावी लागेल.

तुम्ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयासारख्या संस्थेतून बल्ब बनवण्याचे कौशल्य शिकू शकता. या प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला एलईडी लाइटिंगची प्राथमिक माहिती जसे की पीसीबीचे बेसिक, एलईडी ड्रायव्हर, फिटिंग-चाचणी, साहित्य खरेदी, सरकारी अनुदान इ. जाणून घेऊ शकता आणि आपल्या व्यवसायाची पायाभरणी करू शकता.

LED बल्ब बनवण्यासाठी तुम्हाला सोल्डरिंग मशीन, स्टिरर, सीलिंग मशीन इत्यादी अनेक गोष्टींची आवश्यकता भासणार असल्याचे जाणकार नमूद करतात. बल्ब तयार करण्यासाठी आपल्याला एक छोटी जागा देखील लागणार आहे.

LED बल्ब बनवण्यासाठी सुमारे 50 रुपये खर्च येतो आणि तुम्ही तो 100 रुपयांना विकू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही दर महिन्याला 2,000 बल्ब विकून 1,00,000 रुपयांपर्यंत कमाई करू शकता. अशा परिस्थितीत हा एक अतिशय फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो.

English Summary: business idea led bulb making business
Published on: 09 September 2022, 08:48 IST