देशात अनेक नवयुवक नोकरी करण्याऐवजी व्यवसाय करण्यास पसंती दर्शवितात, अनेक नवयुवक आपल्या नोकरीला कंटाळले असतात आणि व्यवसाय करण्याचे स्वप्न बघतात. अशा नवयुवकांसाठी आजची बातमी विशेष आहे. आज आम्ही खास आपल्यासाठी एका व्यवसायाची कल्पना घेऊन हजर झालो आहोत. हा एक असा बिजनेस आहे ज्याची बारामाही मागणी खेड्यापासून ते शहरापर्यंत कायम असते. आज आम्ही आपणास साबण बनवण्याचा व्यवसाय अर्थात सोप मेकिंग बिजनेस विषयी सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया साबण बनवण्याची फॅक्टरी कशी सुरू करायची.
या व्यवसायात एका विशिष्ट मशीनद्वारे साबणाची निर्मिती केली जाते आणि बाजारात विक्री घडवून आणली जाते. असे असले तरी अनेक लोक मशीन ऐवजी हाताने साबण तयार करून बाजारात विक्री करतात. या व्यवसायाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा व्यवसाय छोट्या स्तरापासून देखील सुरू केला जाऊ शकतो. साबण अनेक प्रकारचे असतात लॉन्ड्री सोप (Laundry Soap), ब्यूटी सोप (Beauty Soap), मेडिकेटेड सोप (Medicated Soap), किचन सोप (Kitchen Soap), परफ्यूम्ड सोप (Perfumed Soap) आपण आपल्या बाजाराच्या मागणीनुसार, कुठल्याही एका साबणाची निर्मिती करून चांगला मोठा नफा अर्जित करू शकतात.
अलीकडे छोट्या गावापासून ते मोठ्या शहरापर्यंत साबणाची मोठी मागणी वाढली आहे. छोट्या वस्त्या पासून ते मेट्रो सिटीपर्यंत सर्व ठिकाणी साबणाची प्रचंड मागणी असते. त्यामुळे सोप मेकिंग बिजनेस अर्थात साबण बनवण्याची फॅक्टरी टाकून आपण चांगला मोठा नफा कमवू शकता. खूप कमी भांडवल मध्ये आपण हा व्यवसाय सुरु करू शकता. तसेच या व्यवसायासाठी मोदी सरकारच्या पंतप्रधान मुद्रा योजना या स्कीम अंतर्गत सुमारे 80 टक्क्यांपर्यंत कर्ज देखील घेतले जाऊ शकते.
केंद्र सरकारच्या मुद्रा योजना प्रकल्प प्रोजेक्टनुसार, तुम्ही एका वर्षात एकूण 4 लाख किलो साबणाचे उत्पादन करू शकाल. उत्पादीत केलेल्या साबणाची एकूण किंमत सुमारे 47 लाख रुपये असेल. या व्यवसायातील सर्व खर्च आणि इतर देय रक्कम परत केल्यानंतर, या व्यवसायातून निव्वळ नफा 6 लाख रुपये असेल, म्हणजे दरमहा 50,000 रुपये निव्वळ नफा हा व्यवसाय सुरू करून आपण कमवू शकता.
साबण बनवण्याची फॅक्टरी उभारण्यासाठी, जवळपास 750 चौरस फूट जागेची आवश्यकता भासणार आहे. या एवढ्या जागेपैकी 500 चौरस फूट जागेवर आपणास साबण बनवण्याच्या फॅक्टरी साठी शेड उभारणी करावी लागणार आहे. आणि उर्वरित जागा तशीच उघडी राहू द्यावी लागणार आहे. या व्यवसायसाठी जवळपास आठ प्रकारच्या मशीनची आवश्यकता असते. सोप मेकिंग प्रोजेक्ट नुसार ही मशिन्स खरेदी करण्यासाठी एकूण एक लाख रुपये खर्च येणार आहे.
ज्या व्यवसायाचे सर्वात मोठी विशेषता म्हणजे, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही बँकेतून आपण कर्ज घेऊ शकता आणि या व्यवसायाची पायाभरणी करू शकतात. साबण तयार करण्याची फॅक्टरी उभारण्यासाठी एकूण 15,30,000 रुपये खर्च अपेक्षित असतो. यामध्ये फॅक्टरी साठी आवश्यक जागा आणि शेड, साबण तयार करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, व्यवसायासाठी लागणारे तीन महिन्यांचे खेळते भांडवल यांचा समावेश आहे. जर आपल्याकडे एवढी मोठी रक्कम उपलब्ध नसेल तर चिंता करू नका या व्यवसायासाठी आपणास बँकेद्वारे कर्ज उपलब्ध होते. या व्यवसायासाठी आवश्यक 15 लाख 30 हजार रुपयांपैकी आपल्याला केवळ 3.82 लाख रुपये खर्च करावे लागतील. उर्वरित रक्कम तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज म्हणून घेऊ शकता.
Published on: 18 February 2022, 11:53 IST