Others News

Business Idea : अलीकडे भारत वर्षात नोकरींऐवजी उद्योगधंद्यांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. मित्रांनो तुम्हालाही जर व्यवसाय (Business) सुरु करायचा असेल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जर अतिरिक्त उत्पन्न (Income) मिळवायचे असेल आणि चांगल्या कमाईसाठी व्यवसाय (Small Business Idea) सुरू करण्याचा विचार असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका बिझनेस आयडियाबद्दल (Business Story) सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही चांगली कमाई सहज करू शकणार आहात.

Updated on 06 September, 2022 8:34 AM IST

Business Idea : अलीकडे भारत वर्षात नोकरींऐवजी उद्योगधंद्यांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. मित्रांनो तुम्हालाही जर व्यवसाय (Business) सुरु करायचा असेल तर आजची ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

तुम्हाला जर अतिरिक्त उत्पन्न (Income) मिळवायचे असेल आणि चांगल्या कमाईसाठी व्यवसाय (Small Business Idea) सुरू करण्याचा विचार असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका बिझनेस आयडियाबद्दल (Business Story) सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही चांगली कमाई सहज करू शकणार आहात.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला ज्या व्यवसायाची माहिती देणार आहोत त्या व्यवसायाची (Business News) बारा महिने मोठी डिमांड असते. अशा परिस्थितीत या व्यवसायातून तुम्हाला महिन्याकाठी लाखोंचा नफा (Earn Money) सहज मिळणार आहे.

लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो ब्रेड

भारतात ब्रेड हा सकाळी नाश्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. ब्रेडचा वापर अनेक पदार्थ बनवण्यासाठी देखील केला जातो. ब्रेड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. यामुळे, जाणकार लोकांच्या मते, या व्यवसायात कमाईच्या अधिक संधी निर्माण झाल्या आहेत.

बिजनेस प्लॅन असणार महत्वाचा 

ब्रेड बनवण्याचा कारखाना काढण्यासाठी जमीन, इमारत, मशिन, वीज आणि पाण्याची सुविधा आणि कर्मचारी आवश्यक आहेत. याशिवाय तुमच्याकडे एक चांगला बिझनेस प्लॅन देखील असायला हवा. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे यशस्वीरीत्या नेऊ शकता आणि तुमचा स्वतःचा ब्रॅण्ड बनवू शकता.

ब्रेड मेकिंग बिजनेससाठी किती पैसे गुंतवावे लागतील?

मित्रांनो इतर व्यवसायाप्रमाणेच ब्रेड मेकिंग व्यवसाय लहान स्तरावर सुरू करायचा असेल तर या व्यवसायासाठी अत्यल्प गुंतवणूक किंवा भांडवल लागेल. मात्र, जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरू करायचा असेल तर तुम्हाला या व्यवसायासाठी निश्चितच अधिक भांडवल उभाराव लागणार आहे.

या व्यवसायातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान प्रमाणात हा व्यवसाय उभारण्यासाठी 5 लाखांपर्यंत भांडवलाची गरज भासत असते. याशिवाय 1000 चौरस फूट जागा देखील या व्यवसायासाठी आवश्यक असते, ज्यामध्ये कारखाना सुरू करावा लागणार आहे.

व्यवसायासाठी नोंदणी करावी लागेल बर 

ब्रेड हे एक खाद्यपदार्थ आहे, त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही परवाने देखील आवश्यक राहणार आहेत. तसेच या व्यवसायाची नोंदणी देखील करावी लागेल. तुम्हाला FSSAI कडून फूड बिझनेस ऑपरेशन लायसन्ससाठी देखील अर्ज करावा लागणार आहे.

या व्यवसायातून किती फायदा होऊ शकतो?

जर आपण या व्यवसायातील नफ्याबद्दल बोललो तर आजच्या काळात ब्रेडच्या सामान्य पॅकेटची किंमत 40 रुपये ते 60 रुपये आहे. त्याच वेळी, ते तयार करण्यासाठी खर्च खूप कमी आहे. म्हणजे जर तुम्ही एकाच वेळी मोठ्या प्रमाणात उत्पादन केले तर तुम्हाला एकाचं महिन्यात या व्यवसायातून लाखोंचा नफा होऊ शकतो.

English Summary: business idea bread making business information
Published on: 06 September 2022, 08:34 IST