नवी मुंबई : कोरोना (Corona) संसर्गाने गेल्या दोन वर्षात एवढा विध्वंस घडवून आणला आहे, त्यामुळे लोकांच्या जीवनासोबतच व्यापार जगतही उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनच्या (Lockdown) अंमलबजावणीमुळे हजारो उद्योगांना कुलूप टांगले गेले, त्यामुळे लाखो लोकांचा व्यवसाय हिसकावला गेला.
आता अशा परिस्थितीत पैसे मिळवणे हे एक मोठे आव्हान झाले आहे, जे लोकांसमोर एखाद्या समस्येपेक्षा कमी नाही. जर तुमच्याकडे कोणतीही नोकरी नसेल आणि तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर काळजी करू नका.
आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाबद्दल (Business Idea) माहिती सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही घरी बसून महिन्याला लाखो रुपये सहज कमवू शकता. मात्र तुम्हाला थोडी रिस्क घ्यावी लागेल. जर तुमच्याकडे कोणतेही काम नसेल तर तुम्ही एक छोटासा व्यवसाय (Small Business Idea 2022) सुरू करून करोडपती होण्याचे स्वप्न साकार करू शकता.
हा व्यवसाय असा आहे की जास्त गुंतवणूक (Low Investment Business Idea) करावी लागणार नाही. मित्रांनो आम्ही ज्या व्यवसाय बद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे साबणाचा म्हणजेच सोप मेकिंग बिजनेस.
महत्वाच्या बातम्या:
Small Business Idea : फक्त 3 हजारात सुरु करा हा व्यवसाय आणि कमवा बक्कळ नफा; वाचा याविषयी
आनंदाची बातमी! 10 वी पास उमेदवारांसाठी भारतीय पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी; वाचा संपूर्ण जाहिरात
साबणाची मागणी बारामाही असते शिवाय सर्व लोकांना नेहमीच त्याची गरज असते. या बिजनेसमध्ये तुम्हाला साबण तयार करून विकावे लागणार आहेत. मित्रांनो खरं पाहता साबणाची मोठी बाजारपेठ आहे. यामुळे साबण बनवल्यानंतर (Soap Making Business) चांगल्या किमतीत विकून तुम्ही देखील सहजपणे भरपूर पैसे कमवू शकता. भारतातील अनेक उद्योजक साबण व्यवसायातून लाखो रुपये कमवत आहेत तुम्ही देखील या व्यवसायाच्या माध्यमातून लाखोंची कमाई सहज करू शकता.
साबण तयार करण्याच्या व्यवसायाची प्रक्रिया जाणून घ्या
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक हजार चौरस फूट जमीन उद्योजकाला लागणार आहे. या ठिकाणी साबण बनवण्यासाठी आवश्यक मशिन बसवाव्या लागणार आहेत. यामध्ये तुम्हाला एक्सडर मशीन, मिक्सर मशीन, डाय, कटिंग मशीन लागेल. याशिवाय तुम्हाला साबण बनवण्यासाठी कच्च्या मालाचीही आवश्यकता असेल. याशिवाय तुम्हाला साबण कारखाना चालवण्यासाठी परवाना घ्यावा लागेल. त्याच वेळी, जर आपण खर्चाबद्दल बोललो तर अंदाजानुसार, आपल्याला सुमारे 7 लाख रुपये खर्च येऊ शकतो.
अशी करा मार्केटिंग
कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. शिवाय तयार होणारे नवीन उत्पादन इतर ब्रँडच्या उत्पादनांच्या किमतीत ते बाजारात विकणे थोडे कठीण असते. अशा परिस्थितीत तुमचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला चांगली मार्केटिंग स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागेल, ज्यामुळे विक्री वाढेल. तुम्ही तुमच्या उत्पादनाची सोशल मीडिया आणि पोस्टर्स आणि बॅनरद्वारे सहज मार्केटिंग करू शकता.
याशिवाय तुमच्या उत्पादनाच्या मार्केटिंगसोबतच तुम्हाला त्याच्या गुणवत्तेकडेही लक्ष द्यावे लागेल. लोकांना बाजारात चांगल्या दर्जाच्या वस्तू आवडतात. अशा परिस्थितीत, हळूहळू तुमचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुमचे उत्पादन चांगले विकले जाईल. सुरुवातीला, तुम्हाला तुमच्या उत्पादनावर सुमारे 15 टक्के नफा मिळेल. जसजसा व्यवसाय मोठा होत जाईल तसतसे उत्पन्नात वाढ होईल. निश्चितच या व्यवसायातून उद्योजक लाखो रुपयांची कमाई करू शकतात मात्र यासाठी मालाचा दर्जा आणि मार्केटिंग करणे अतिशय महत्त्वाचे राहणार आहे.
Published on: 07 May 2022, 12:27 IST