Others News

व्यवसाय (Business) सुरु करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी आजची ही बातमी खास आहे. जर तुम्हाला देखील व्यवसाय सुरु करायचा असेल तर आजची हा लेख संपूर्ण वाचा. तुम्हाला कमी गुंतवणुकीत (Low Investment Business) तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करून मालक बनायचे असेल, तर तुम्ही स्नॅक्सचा अर्थात कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय (Snacks Making Business) सुरू करू शकता आणि लाखोंची कमाई करू शकता.

Updated on 29 May, 2022 8:13 PM IST

व्यवसाय (Business) सुरु करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी आजची ही बातमी खास आहे. जर तुम्हाला देखील व्यवसाय सुरु करायचा असेल तर आजची हा लेख संपूर्ण वाचा. तुम्हाला कमी गुंतवणुकीत (Low Investment Business) तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करून मालक बनायचे असेल, तर तुम्ही स्नॅक्सचा अर्थात कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय (Snacks Making Business) सुरू करू शकता आणि लाखोंची कमाई करू शकता.

या व्यवसायाला खूप मागणी आहे शिवाय हा बारामाही चालणारा व्यवसाय आहे. स्नॅक्स (Snacks Making Business) केवळ मुलांनाच आवडते असे नाही तर प्रौढांना देखील आवडते. खरं पाहता कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय हा सदाबहार अन बारामाही चालणारा व्यवसाय आहे. आजचा ही बिझनेस आयडिया अशा लोकांसाठी आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय कमी गुंतवणुकीत करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया कुरकुरे बनवण्याच्या व्यवसायाची सर्व माहिती तपशीलवार.

मित्रांनो या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा असा व्यवसाय आहे, जो गावात किंवा शहरात कुठेही सुरू करता येतो. खरं पाहता आपल्या राज्यात असं म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशात नमकीन किंवा कुरकुरे खूप आवडीने खाल्ले जाते. सकाळच्या चहासोबत बिस्किट आणि कुरकुरे खाणे बहुतेकांना आवडते. जरी बाजारात अनेक प्रकारचे नमकीन उपलब्ध असले तरी देखील जर तुम्ही लोकांना नमकीनमध्ये वेगळी चव दिली तर तुम्ही तुमचा मोठा बाजार काही दिवसात तयार करू शकता.

असा व्यवसाय सुरू करा

मनीकंट्रोलच्या एका रिपोर्टनुसार, स्नॅक्स मेकिंग व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर यासाठी 300 चौरस फूट ते 500 चौरस फूट जागा आपल्याला लागणार आहे. एवढेच नाही तर या व्यवसायासाठी अनेक प्रकारच्या सरकारी परवानग्या देखील घ्याव्या लागणार आहेत. यामध्ये अन्न परवाना, एमएसएमई नोंदणी आणि जीएसटी नोंदणी इत्यादींचा समावेश आहे. या व्यवसायासाठी एक फॅक्टरी उभारावी लागेल यासाठी 5 ते 8 किलोवॅट वीज जोडणी लागेल.

या वस्तूंची आवश्यकता असेल

नमकीन बनवण्यासाठी तुम्हाला मैदा, तेल, बेसन, मीठ, तेल, मसाले, शेंगदाणे, नमकीनमध्ये वापरल्या जाणार्‍या डाळींची गरज असेल. एवढेच नाही तर कुरकुरे तयार करण्यासाठी, तुम्हाला काही मशीन्सची आवश्यकता असेल जसे की सेव्ह मेकिंग मशीन, फ्रायर मशीन, पॅकेजिंग आणि वजनाचे यंत्र इ. यासोबतच तुम्हाला 1-2 कर्मचाऱ्यांचीही आवश्यकता असेल.

या व्यवसायासाठी किती येईल खर्च आणि कमाई नेमकी किती होईल 

मित्रांनो कुरकुरे मेकिंग बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान 2 ते 6 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल असा जाणकार लोकांचा अंदाज आहे. व्यवसाय सुरू केल्यानंतर लवकरच, तुम्ही खर्चाच्या 20 ते 30 टक्के नफा म्हणून कमवू शकता. निश्चितच व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तींसाठी हा व्यवसाय चांगला लाभप्रद ठरणार आहे.

English Summary: Business Idea 2022: Start a Crispy Making Business and Become a Millionaire Soon, Read More
Published on: 29 May 2022, 08:13 IST