मित्रांनो जर आपणास व्यवसाय (Business Idea 2022) सुरू करायचा असेल मात्र व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसेल, तर चिंता करू नका आज आम्ही तुमच्यासाठी कमी गुंतवणुकीत सुरू करता येणार्या व्यवसायांची (Low Investment Business Idea) यादी घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण या लेखच्या माध्यमातून कमी भांडवलमध्ये तसेच बारामाही चालणाऱ्या व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत.
खरं पाहता अलीकडे देशातील नवयुवक नोकरी करण्यापेक्षा उद्योगधंद्याला अधिक पसंती दाखवित आहेत. मात्र असे असतानाही व्यवसायाची योग्य ती कल्पना नसल्यामुळे नव युवकांना व्यवसाय सुरू करण्यात मोठ्या अडचणी येतात. हीच बाब लक्षात घेऊन आज आम्ही विशेषता नवयुवकांसाठी काही भन्नाट बिजनेसची आयडिया घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया याविषयी.
सौर व्यवसायातून नफा
आजकाल ऊर्जेची मागणी मोठ्या झपाट्याने वाढत आहे. असं म्हणण्यापेक्षा ऊर्जेची मागणी ही ऑल रेडी वाढली आहे. त्यामुळे तुम्ही जर व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर आपण सौरऊर्जेचा व्यवसायाचा एकदा अवश्य विचार करू शकता. हा व्यवसाय सुरु करून तुम्ही चांगला नफा निश्चितच प्राप्त करू शकता. मित्रांनो हा व्यवसाय अतिशय कमी गुंतवणुकीत सुरु केला जाऊ शकतो. तुम्हाला जर सौरऊर्जेचा व्यवसाय सुरु करायचा असेल, तर तुम्ही डीलरशिप, डिस्ट्रीब्युटर, सोलर इंस्टॉलर बनून चांगला बक्कळ पैसा अर्जित करू शकता.
खरं काय! चंद्रावर शेती करता येणार; चंद्रावरून आणलेल्या मातीत बहरलं रोपटं; वाचा याविषयी
किराणा दुकान
मित्रांनो जर आपणास व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण किराणा दुकान सुरू करून चांगली कमाई करू शकता. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या व्यवसायाची मागणी ही बारामाही कायम असते. यामुळे हा व्यवसाय सुरू करून बारामाही कमाई केली जाऊ शकते. तसेच हा व्यवसाय अतिशय छोट्या स्तरावर कमी गुंतवणूक करून केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर हा व्यवसाय आपण आपल्या राहत्या घरी देखील सुरू करू शकता. निश्चितच हा व्यवसाय नवयुवकांसाठी मोठा फायद्याचा ठरणार आहे.
आनंदाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून मिळतील 29 हजार 700 रुपये; वाचा याविषयी
इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय म्हणजे हमखास चालणारा व्यवसाय
मित्रांनो आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात बारामाही सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यामुळे आपल्या देशाची संस्कृतीला मोठे अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतात रोजाना काही ना काही सण किंवा उत्सव साजरे होतं राहतात.
अशा फंक्शनमध्ये सर्वकाही व्यवस्थापित करणे एक कठीण काम मानले जाते. त्यामुळे लोक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीशी संपर्क साधत आहेत. यामुळे तुम्ही देखील संधीचे सोने करून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तयार करू शकता आणि तुम्ही व्यवस्थापक म्हणून काम करून चांगला बक्कळ नफा कमवू शकता. निश्चितच इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो.
Royal Enfield: रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बुलेट लाँच करणार; वाचा याविषयी
इंटिरियर डिझाइनिंग
मित्रांनो बदलत्या काळात भारतात आता मोठ्या प्रमाणात इंटीरियर डेकोरेशन केले जाऊ लागले आहे. देशात आता इंटरियर डिझाईन खूप लोकप्रिय बनले आहे. इंटरियर डिझाईन म्हणजे घर किंवा कार्यालय आकर्षक बनविणे. सध्या या व्यवसायाला मोठा स्कोप आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे इंटिरिअर डिझायनिंगचे कौशल्य असेल तर आपण निश्चितच हा व्यवसाय सुरु करून चांगला बक्कळ पैसा छापू शकता. मोठ्या रेस्टॉरंटपासून ऑफिस किंवा होम इंटीरियर डिझायनिंगपर्यंत सर्वत्र कमाई करण्याची मोठी संधी आहे.
Aayushman Card Yojana: 'या' सरकारी योजनेच्या माध्यमातून मिळणार 5 लाखांची मदत
Published on: 22 May 2022, 11:56 IST