आपण बरेचदा बाजारपेठेतून सोने खरेदी करतो. परंतु खरेदी केलेल्या सोन्याचे शुद्धतेबद्दल आपण सांशक असतो. बरेचदा लोकांची या माध्यमातून फसवणूक होते. यावर उपाय म्हणून सरकारने हॉलमार्किंगची सुविधा लागू केली आहे त्यामुळे आता हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची विक्री करणे सक्तीचे आहे. परंतु तरीसुद्धा खरेदी केलेले सोने खरे आहे की नाही याचा लोकांना प्रश्न पडतो.
या समस्येवर उपाय म्हणून बीआयएस अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टैंडर्डने एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे व या एप्लीकेशन चे नाव आहे 'बीआयएस केअर ॲप' होय.
याच्या माध्यमातून तुम्हाला तुम्ही खरेदी केलेल्या हॉलमार्क दागिन्यांची शुद्धता त्वरित कळू शकेल. आपल्याला माहित असेलच की मागच्या वर्षी एक जुलैपासून सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग चिन्ह बदलले गेले होते.
अगोदर हॉलमार्क दागिन्यांवर चार ते पाच चिन्हे असायची. परंतु आता फक्त तीन चिन्हे असतात. यातील पहिले चिन्ह बीआयएस हॉलमार्क, दुसरे शुद्धतेबद्दल दर्शवते तर दुसरे चिन्ह सहा अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे. हा कोड म्हणजेच हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो.
या कोड मध्ये काही अक्षरे आणि अंक असतात. जेव्हा दागिन्यांची हॉलमार्किंग होते तेव्हा प्रत्येक दागिन्यांचा एक हॉल मार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो. हा नंबर एका दागिन्यासाठी एकच असतो. म्हणजेच एका नंबरचे दोन दागिने असूच शकत नाही.
नक्की वाचा:खुशखबर! सोने खरेदीदारांचे अच्छे दिन, सोने चांदी झाले इतक्या रुपयांनी स्वस्त...
'या' ॲपचा वापर कसा करावा?
ॲप वापरण्यासाठी तुम्हाला अगोदर ते डाऊनलोड करावे लागेल व डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ते ओपन करून त्यामध्ये तुमचे नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागेल व त्यानंतर
तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ओटीपी द्वारे व्हेरिफाय केला जाईल. पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही हे वापरू शकतात.
बीआयएस केअर ऍप मध्ये व्हेरिफाय आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच 'व्हेरिफाय एचयुआयडी' हा ऑप्शन देण्यात आला असून याच्या मदतीने तुम्ही तुमच्या हॉलमार्क केलेल्या दागिन्याची शुद्धता तपासू शकतात.
Published on: 09 August 2022, 12:23 IST