कर्मचारी निवड आयोग कॉन्स्टेबल आणि रायफल मॅन या पदांसाठी भरती प्रक्रिया लवकर संपत आहे. इच्छुक उमेदवार एसएससी जीडी कॉन्स्टेबल 2021 भरतीसाठी ssc.nic.in किंवा उमंग ॲप द्वारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. सचिवालय सुरक्षा दल मध्ये एसएससी जीडी कॉन्स्टेबल मधील रिक्त जागा ऑल इंडिया बेसिस वर भरल्या जातील. तसेच विविध राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त पदानुसार सीएपीएफ मध्ये इतर इतर जागा भरल्या जातील. सीमा सुरक्षा दल,केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, आयटीबीपी, एसएसबी,राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सचिवालय सुरक्षा दल तसेच आसाम रायफल्स अंतर्गत एकूण 25 हजार 271 पदे उपलब्ध
या भरती चे महत्वाचे दिनांक
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख- 31 ऑगस्ट 2021
- ऑफलाइन चलन तयार करण्याची शेवटची तारीख- 4 सप्टेंबर 2021
- चलनाद्वारे पेमेंट करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2021
- निवडलेल्या उमेदवारांना एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा 2021 साठी बोलावले जाईल यासाठी सारखा नंतर अधिसूचित केल्या जातील.
- एसएससी जीडी कॉन्स्टेबल 2021 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 20 वर्षे दरम्यान असावे
- एस एस सी जीडी कॉन्स्टेबल वेतन लेव्हल 3- एकवीस हजार 700 रुपये ते 69 हजार शंभर रुपये असेल.
माहिती स्त्रोत - लोकसत्ता
Published on: 27 August 2021, 08:42 IST