नवी दिल्ली: जागतिक ई-व्यापार कंपनी ॲमेझॉनने नोकरीच्या बंपर संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘लोकल टू ग्लोबल’ करिअरच्या महामेळ्यात कंपनी लाखो नोकरीच्या संधी उपलब्ध करणार आहे. यापैकी भारतात तब्बल 8000 नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कॉर्पोरेट, टेक्नॉलॉजी तसेच मार्केटिंग इ. विविध स्तरावर नोकरीच्या संधी उपलब्ध असतील. कंपनीच्या सीईओ अँडी जेस्सी यांनी याविषयीची माहिती दिली आहे. गूगल व फेसबुकच्या तुलनेत ही सर्वाधिक कर्मचाऱ्यांची संख्या ठरणार आहे.
जुलै मध्ये ॲमेझॉनची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या मुलाखतीमध्ये जेस्सी यांनी कंपनीच्या बळकटीकरणाचा मुद्दा मांडला होता. अमेरिकेनंतर जपान, भारत या देशातही कंपनीच्या वतीने करिअर फेअरचे आयोजन केले जाणार आहे. amazon.jobs/in या कंपनीच्या संकेस्थळावर याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
ॲमेझॉन करिअर दिवस (Amazon Career Day)
ॲमेझॉन करिअर दिवसाची सुरुवात 16 सप्टेंबर 2021 ला सकाळी दहा वाजता होईल. सर्वांसाठी मोफत असलेला इव्हेंट आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठी ही संधी असेल. तुमचा पूर्वीचा कामाचा अनुभव, व्यावसायिक क्षेत्राचा अनुभव भिन्न असला तरी तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकतात.
रजिस्ट्रेशन कसे करावे?
करिअर फेअरच्या रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला https://www.amazoncareerday.com/india/home वर क्लिक करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आता रजिस्टर करा वर क्लिक करा आणि त्यानंतर उपलब्ध झालेला फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. Amazon Career Day ॲमेझॉन करिअर दिवसात भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. परंतु ॲमेझॉन एचआर प्रतिनिधी सोबत करिअर सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता आहे. या कार्यक्रमात ग्लोबल सिनिअर व्हाईस चेअरमन आणि कंट्री हेड अमित अग्रवाल, सीईओ द्वारे करिअर मार्गदर्शन और कंपनीच्या सिनिअर मॅनेजमेंट पॅनेल डिस्कशन घेतील
ॲमेझॉन भारतातील ३५ शहरांत ८००० थेट नोकरीच्या संधी उपलब्ध करणार आहे. यामध्ये कॉर्पोरेट, टेक्नॉलॉजी सेक्टर, कस्टमर सर्व्हिस आणि ऑपरेशन रोल्स इ. पदांवर संधी असतील.
बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, गुडगाव, मुंबई, पुणे, भोपाळ, जयपूर, कानपूर, सूरत यासह तब्बल ५० शहरात थेट नोकरीच्या संधी असल्याची माहिती कंपनीच्या एचआर दीप्ती वर्मा यांनी दिली.
कंपनीने आजतागायत ३ लाख व्यक्तींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे थेट नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि कोविड महामारीच्या कालावधीतही व्हर्च्युअल पद्धतीने कर्मचाऱ्यांना सामावून घेतले.
Published on: 12 September 2021, 10:20 IST